विदर्भात दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचा मृत्यू; रुग्णसंख्या १,४३,६५४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:06 PM2020-09-28T22:06:15+5:302020-09-28T22:07:23+5:30
विदर्भात सप्टेंबर महिन्यातील सर्वात कमी रुग्ण व मृतांची सोमवारी नोंद झाली. आज दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचे मृत्यू तर २,१०९ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,४३,६५४ झाली असून मृतांची संख्या ३,८३२ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात सप्टेंबर महिन्यातील सर्वात कमी रुग्ण व मृतांची सोमवारी नोंद झाली. आज दिवसभरात ५८ कोरोनाबाधितांचे मृत्यू तर २,१०९ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,४३,६५४ झाली असून मृतांची संख्या ३,८३२ वर पोहचली आहे. नागपुरात ८६२, चंद्रपूरमध्ये २३०, गोंदियात २२९ तर अमरावतीमध्ये २०४ रुग्ण आढळून आले.
नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या मंदावली असताना आता मृत्यूच्या संख्येतही घट आली आहे. ३० रुग्णांचे बळी गेले. मृतांची एकूण संख्या २,४१३ झाली असून रुग्णसंख्या ७५,६८३ वर पोहचली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज २३० रुग्णांची भर पडली असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ९,८१२ तर मृतांची संख्या १४८ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात २२९ रुग्णांना कोरोना असल्याचे निदान झाले. बाधितांची एकूण संख्या ४,१७४ झाली. या जिल्ह्यातही पाच रुग्णांचे बळी गेले असून मृतांची संख्या ९३ वर गेली आहे. अमरावती जिल्ह्यात २०४ रुग्ण पॉझिटिव्ह तर पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ५१०७ तर मृतांची संख्या २७९ वर गेली आहे.
भंडारा जिल्ह्यात १५७ रुग्ण व दोन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ५१०७ झाली असून मृतांची संख्या १०५वर पोहचली आहे. अकोला जिल्ह्यात ८९ रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यात ८५ रुग्ण व चार रुग्णांचे बळी गेले. बुलडाणा जिल्ह्यात ८४ रुग्ण व दोन बळी गेले. वर्धा जिल्ह्यात ६६ रुग्ण व सहा मृत्यूची नोंद झाली. वाशिम जिल्ह्यात ५१ रुग्ण पॉझिटिव्ह व दोन रुग्णांचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यात ४९ रुग्णांची नोंद झाली.