५.८० लाखाचे साहित्य लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:09 AM2021-03-23T04:09:46+5:302021-03-23T04:09:46+5:30

कळमेश्वर : चाेरट्याने ट्रकचे सील ताेडून आतील साहित्याचे तीन बाॅक्स चाेरून नेले. त्या बाॅक्समध्ये एकूण ५ लाख ८० हजार ...

5.80 lakh material lampas | ५.८० लाखाचे साहित्य लंपास

५.८० लाखाचे साहित्य लंपास

Next

कळमेश्वर : चाेरट्याने ट्रकचे सील ताेडून आतील साहित्याचे तीन बाॅक्स चाेरून नेले. त्या बाॅक्समध्ये एकूण ५ लाख ८० हजार ७९० रुपये किमतीचे साहित्य हाेते. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नुकतीच घडली.

हमीद खान वाहीद खान (४३, रा. अल्लाउद्दीन काेटी, सनथनगर, खैराताबाद, जिल्हा रंगारेड्डी, तेलंगणा) यांनी त्यांच्या टीएन-०७/यूसी-५३७६ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ३२० बाॅक्स भरून हा ट्रक मेडचल, रंगारेड्डी येथून येरला (ता. कळमेश्वर) येथील कंपनीच्या गाेडाऊनमध्ये पाठविला हाेता. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने या ट्रकचे सील ताेडून आतील तीन बाॅक्स चाेरून नेले. त्या तिन्ही बाॅक्समध्ये एकूण ५ लाख ८० हजार ७९० रुपये किमतीचे विविध साहित्य हाेते, अशी माहिती त्यांनी पाेलिसांना दिली. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक मनाेज खडसे करीत आहेत.

Web Title: 5.80 lakh material lampas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.