अग्निवीरसाठी विदर्भातून ५९,९११ उमेदवारांची नोंदणी; जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 07:58 PM2022-08-29T19:58:46+5:302022-08-29T19:59:35+5:30

Nagpur News ‘अग्निवीर’ अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून ५९ हजार ९११ उमेदवारांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

59,911 candidates registered from Vidarbha for Agniveer; Collector reviewed | अग्निवीरसाठी विदर्भातून ५९,९११ उमेदवारांची नोंदणी; जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

अग्निवीरसाठी विदर्भातून ५९,९११ उमेदवारांची नोंदणी; जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

googlenewsNext
ठळक मुद्देमानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार निवड प्रक्रिया

नागपूर : ‘अग्निवीर’ अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून ५९ हजार ९११ उमेदवारांची नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांचीच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच नोंदणी झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हानिहाय निवड प्रक्रिया आता मानकापूर क्रीडा संकुल येथे पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी सोमवारी दिली.

त्यासाठी आवश्यक असणाऱ्या शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रीडा संकुल हे योग्य स्थळ असून, याच ठिकाणी ही प्रक्रिया पार पडली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा व अन्य व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना सोमवारी त्यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान दिल्या. मानकापूर जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी दिलेल्या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, सैन्य भरती कार्यालय नागपूरचे संचालक कर्नल जगतनारायण, क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे विभागीय उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: 59,911 candidates registered from Vidarbha for Agniveer; Collector reviewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार