चुकीचे रीडिंग घेणाऱ्या ६ एजन्सी बडतर्फ; महावितरणचा दणका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 08:51 PM2022-02-16T20:51:49+5:302022-02-16T20:52:14+5:30

Nagpur News चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास देणाऱ्या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सींना महावितरणने बडतर्फ केले आहे.

6 agencies taking wrong readings; MSEDCL | चुकीचे रीडिंग घेणाऱ्या ६ एजन्सी बडतर्फ; महावितरणचा दणका 

चुकीचे रीडिंग घेणाऱ्या ६ एजन्सी बडतर्फ; महावितरणचा दणका 

Next
ठळक मुद्देलोकमतने वेधले होते लक्ष

नागपूर : चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास देणाऱ्या राज्यातील सहा मीटर रीडिंग एजन्सींना महावितरणने बडतर्फ केले आहे. यात पुणे जिल्ह्यातील २ तसेच औरंगाबाद, वसई, नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक अशा सहा मीटर रीडिंग एजन्सींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करून वीजमीटर रीडिंगबाबत नागरिकांना होत असलेल्या तक्रारींचा मुद्दा उपस्थित केला होता. महावितरणने त्याची दखल घेत मीटर रीडिंग घेणाऱ्या सर्व एजन्सींशी संपर्क करून नाराजी व्यक्त केली होती. प्राथमिक चौकशीत सहा एजन्सी दोषी आढळून आल्या. यात परिमल एंटरप्रायजेस, सासवड, बारामती व गणेश एंटरप्रायजेस, शिरूर,केडगाव, सुप्रीम पॉवर सर्व्हिसेस, अंधेरी, वसई, महाराष्ट्र इलेक्ट्रिकल, किनवट, भोकर, नंदिनी एंटरप्रायजेस औरंगाबाद आणि अजिंक्य महिला बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, अकोला यांचा समावेश आहे. मीटर रीडिंगच्या कामात कुचराई केल्याचा यांच्यावर आरोप असून या एजन्सीविरुद्ध थेट बडतर्फीची कारवाई करून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Web Title: 6 agencies taking wrong readings; MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज