कोरोनाचा ९ पैकी ६ मृत्यू ६०वर्षांवरील, आणखी दोन मृत्यूची भर; कोव्हिड मृत्यू विश्लेषण समिती
By सुमेध वाघमार | Published: May 2, 2023 07:52 PM2023-05-02T19:52:03+5:302023-05-02T19:52:45+5:30
कोव्हिड मृत्यू विश्लेषण समितीने मंगळवारी शहरातील कोरोना मृत्यूचा आढावा घेतला.
सुमेध वाघमारे, नागपूर: कोव्हिड मृत्यू विश्लेषण समितीने मंगळवारी शहरातील कोरोना मृत्यूचा आढावा घेतला. यात दोन मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे प्रमाणित केले. विशेष म्हणजे, जानेवारी ते आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे ९ रुग्णांचा जीव गेला. यातील ६ मृत्यू हे ६०वर्षांवरील रुग्णांचे होते.
कोरोनाची रुग्णसंख्या रोज कमी, जास्त होतांना दिसून येत आहे. एप्रिल महिन्यात २ हजार ५०३ नवे रुग्ण आढळून आले आहे. पूर्वी मृताचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याची नोंद कोरोना मृत्यू अशी व्हायची. परंतु आता अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित प्रकरण कोव्हिड मृत्यू विश्लेषण समितीसमोर ठेवले जाते. त्यानंतर मृत्यूची नोंद होती. मंगळवारी या समितीसमोर २ मृतांची माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता एक रुग्ण चंद्रपूर व दुसरा गडचिरोली जिल्हयातील होता. यापैकी दोन्हीही रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे प्रमाणित करण्यात आले. १ एप्रिल २०२३ पासून ३ मृत्यु विश्लेषन बैठकी झाल्या. यामध्ये एकूण १५ संशयीत कोरोना रुग्णांच्या मृत्युचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी ९ मृत्यु कोरोनामुळे झाल्याचे घोषीत करण्यात आले. यामध्ये ६० वर्षावरील रुग्णांची संख्या ६ इतकी होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"