२०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी; मिळाले ५ कोटी
By गणेश हुड | Published: May 17, 2023 07:04 PM2023-05-17T19:04:47+5:302023-05-17T19:05:09+5:30
Nagpur News जिल्हा परिषदेने २०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. परंतु या कामासाठी जेमतेम ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
गणेश हूड
नागपूर : गेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्हयातील ग्रामीण भागातील रस्ते , पूल वाहून गेले. उन्हाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेने २०६ रस्त्यांच्या कामासाठी ६० कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. परंतु या कामासाठी जेमतेम ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
दुरुस्तीसाठी निधी मिळणार नसल्याने लोकांना पावसाळ्यात अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.
मागील सहा वर्षांत इतका कमी निधी प्रथमच मिळाला आहे. २०२२-२३ या वर्षात ३७ कोटी, २०२१-२२ या वर्षात २५ कोटी तर २०१८-१९ या वर्षात २३ कोटी ५० लाखांचा निधी मिळाला होता. मागील पावसाळ्यात जिल्हयातील रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले झाले. खड्ड्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिक त्रस्त आहेत. असे असतानाही मागणीच्या निम्माही निधी प्राप्त झालेला नाही. ५ कोटीतून रस्ते व पुलाची कामे करणे शक्य नसल्याने नागरिकांना त्रास सोसावा लागणार आहे.