नागपुरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी ६० कोटी उपलब्ध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:29 PM2018-10-01T23:29:29+5:302018-10-01T23:32:24+5:30
शहरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी ६० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यातून शहरातील क्रीडांगणांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या व आमदारांनी सुचविलेल्या खेळाच्या मैदानांच्या विकासासाठी प्रत्येक आमदाराला नऊ कोटी रुपये देण्याचा व विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी सहा कोटी देण्यात येणार असल्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी ६० कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. यातून शहरातील क्रीडांगणांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या व आमदारांनी सुचविलेल्या खेळाच्या मैदानांच्या विकासासाठी प्रत्येक आमदाराला नऊ कोटी रुपये देण्याचा व विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी सहा कोटी देण्यात येणार असल्याचा निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत घेतला.
हैदराबाद हाऊस येथे झालेल्या या बैठकीला आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, उपमहापौर दीपराज पार्डीकर उपस्थित होते.
खेळाच्या मैदानाची कामे नागपूर सुधार प्रन्यासमार्फत करण्यात येणार आहेत. या निधीतून खेळाच्या मैदानाच्या कम्पाऊंड वॉल दुरुस्त करणे, खेळाचे साहित्य, मैदानाची दुरुस्ती व आमदार सुचवितील ती कामे करावीत. यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या समितीत नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार, मनपाचे क्रीडा उपसंचालक, क्रीडा उपसंचालक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा समावेश असेल. सर्व कामांवर या समितीचे नियंत्रण राहील. उपसंचालक क्रीडा या समितीचे सदस्य सचिव राहतील. कामाचे प्रस्ताव लवकर सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
शहरातील ३८ प्रभागांमध्ये येणाºया मैदानांचा विकास या निधीतून होणार आहे. तसेच खासदार क्रीडा महोत्सवानंतर आता ३५ मैदानांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धा
मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात येणार असल्याचे या बैठकीत ठरले. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील १२ आमदारांनी लागणाºया खर्चाचे बजेट सादर करावे. प्रत्येकी सहा लाख रुपये या स्पर्धेसाठी देण्याचे ठरले. ज्या क्रीडा स्पर्धा या मुख्यमंत्री चषक स्पर्धेत घेण्यात येणार आहेत, त्याची यादीही तयार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होईल.