राज्यातील ६० टक्के लॉकर्स असुरक्षित; नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 10:08 AM2017-11-24T10:08:43+5:302017-11-24T10:11:19+5:30

सरकारी बँका, नागरी बँका, सहकारी पतसंस्था व लॉकर कंपन्या रिझर्व्ह बँकेच्या नियमांची पायमल्ली करीत असून, या संस्थांनी उभे केलेले जवळपास ६० टक्के लॉकर्स असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

60 percent lockers in the state are unsafe; Scam of rules | राज्यातील ६० टक्के लॉकर्स असुरक्षित; नियमांची पायमल्ली

राज्यातील ६० टक्के लॉकर्स असुरक्षित; नियमांची पायमल्ली

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात सुमारे १,००,००० लॉकर्सपतसंस्था लॉकर्ससंबंधी नियम पाळत नाहीत

सोपान पांढरीपांडे ।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सरकारी बँका, नागरी बँका, सहकारी पतसंस्था व लॉकर कंपन्या रिझर्व्ह बँकेच्या नियमांची पायमल्ली करीत असून, या संस्थांनी उभे केलेले जवळपास ६० टक्के लॉकर्स असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या नियमांशी सुसंगत लॉकर रूम्स प्रचंड महाग आहेत. परंतु तशाच दिसणाऱ्या साध्या पत्राच्या लॉकर रूम बऱ्याच स्वस्त आहेत म्हणून बहुतेक अर्बन बँका, सहकारी पतसंस्था व लॉकर कंपन्या या स्वस्त लॉकर रूमचा वापर करतात.
यासंबंधी बोलताना महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर यांनी अर्बन बँका रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे काटेकोट पालन करीत नाहीत, हे मान्य केले. महाराष्ट्रात ५०० अर्बन बँकांच्या ५,६२८ शाखा आहेत व लॉकर्सची संख्या १२ ते १५ लाख असावी. यापैकी फार तर ४० टक्के लॉकर्स रिझर्व्ह बँकेच्या नियमात बसतील, असेही अनासकर म्हणाले. अनासकर हे पुण्याच्या विद्या सहकारी बँकेचेही अध्यक्ष आहेत. विद्या सहकारी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पूर्णत: पालन करते, हेही त्यांनी आवर्जून सांगितले.
पण याबद्दल अनासकर यांनी रिझर्व्ह बँकेला दोष दिला. रिझर्व्ह बँक अर्बन बँकांना लायसन्स देते व दरवर्षी इन्स्पेक्शनही करीत असते. एखादी बँक जर लॉकरसंबंधी नियम पाळत नसेल तर रिझर्व्ह बँकेने ते तपासणी अहवालात नोंदवून तशी पूर्तता करून घ्यायला हवी, असे अनासकर म्हणाले.
महाराष्ट्र सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ काका कोयटे म्हणाले, पतसंस्थांवर रिझर्व्ह बँकेचे नियम पाळणे कायद्याने बंधनकारक नाही म्हणून बहुतेक पतसंस्था लॉकरसंबंधी नियम पाळत नाहीत. पण हे अयोग्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी त्यांनी लॉकरसंबंधी नियम पाळलेच पाहिजे, असे बंधन सहकार खात्याने पतसंस्थांवर घातले पाहिजे. आपण सहकार खात्याला तशी विनंती करू, असेही कोयटे म्हणाले.
कोपरगावच्या समता सहकारी पतसंस्थेचे असलेले कोयटे यांनी महाराष्ट्रात १६,००० पतसंस्था त्यापैकी २००० पतसंस्थांचे १,००,००० लॉकर्स असावेत, अशी माहितीही दिली.
इंडियन बँक्स असोसिएशनचे सीईओ जी. व्ही. कन्नन यांच्याशी दोन दिवस प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. देशातील सरकारी बँका, विदेशी बँका, अर्बन को-आॅपरेटिव्ह बँका व खासगी बँका अशा २४० बँकांचे व त्यांच्या १.४५ लाख शाखांचे प्रतिनिधित्व आयबीए करते.

Web Title: 60 percent lockers in the state are unsafe; Scam of rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.