सोने ६०० तर चांदीत २२०० रुपयांची वाढ
By मोरेश्वर मानापुरे | Published: June 6, 2024 08:42 PM2024-06-06T20:42:08+5:302024-06-06T20:42:23+5:30
गेल्या महिन्यात चांदीच्या भावात मोठी चढउतार झाली.
नागपूर : आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी झालेल्या घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारात दिसून आला. ५ जूनच्या तुलनेत गुरुवार, ६ रोजी दहा ग्रॅम शुद्ध सोन्याचे भाव ६०० रुपयांनी वाढून ७३ हजार आणि प्रतिकिलो चांदी २,२०० रुपयांच्या वाढीसह ९१,५०० रुपयांवर पोहोचली.
गेल्या महिन्यात चांदीच्या भावात मोठी चढउतार झाली. एकाच महिन्यात १० हजारांनी भाव वाढले. २१ मे आणि २८ मे रोजी प्रतिकिलो चांदी ९४ हजारांवर होती. त्यानंतर भावात घसरण झाली. ५ जूनला भाव ८९,३०० रुपयांपर्यंत कमी झाले. मात्र ६ रोजी भाव २,२०० रुपयांनी वाढून ९१,५०० रुपयांवर गेले. चांदी ९४ हजारांवर गेली तेव्हा तज्ज्ञांनी भाव लवकरच लाखांवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला होता. गुरुवारी ३ टक्के जीएसटीसह चांदीचे भाव ९३,२४५ रुपये तर सोन्याचे भाव ७५,१९० रुपये होते.