दिलासा! १० दिवसांत रुग्णसंख्येच्या तुलनेत ६१ टक्के रुग्ण पूर्ण ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 12:47 PM2022-02-07T12:47:00+5:302022-02-07T13:47:47+5:30

नागपूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने जोर पकडला; परंतु २६ जानेवारीनंतर रुग्णसंख्येचा वेग कमी होऊ लागला.

61% covid-19 patients in nagpur district were completely healed in past 10 days | दिलासा! १० दिवसांत रुग्णसंख्येच्या तुलनेत ६१ टक्के रुग्ण पूर्ण ठणठणीत

दिलासा! १० दिवसांत रुग्णसंख्येच्या तुलनेत ६१ टक्के रुग्ण पूर्ण ठणठणीत

Next
ठळक मुद्दे-१,४१९ रुग्ण, २ मृत्यूची नोंद : पॉझिटिव्हीटीचा दर १६ टक्क्यांवर

नागपूर : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना मागील १० दिवसांत नोंद झालेल्या रुग्णांच्या तुलनेत ६१ टक्के रुग्ण बरे झाले. रविवारी, १,४१९ रुग्ण व २ मृत्यूची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ५,७२,०२४ झाली असून, मृतांची संख्या १०,२८८ वर पोहोचली आहे.

नागपूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने जोर पकडला; परंतु २६ जानेवारीनंतर रुग्णसंख्येचा वेग कमी होऊ लागला. विशेष म्हणजे, २७ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या १० दिवसांत २१,८०० रुग्णांची नोंद झाली असताना याच कालावधित यापेक्षा अधिक ३५,५७७ रुग्ण बरे झाले. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत ५,४७,१३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचा दर ९५.६५ टक्क्यांवर पोहोचला आहे.

-शहरात ८०६, तर ग्रामीणमध्ये ५७९ रुग्ण पॉझिटिव्ह

नागपूर जिल्ह्यात रविवारी ८,९७४ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत १६ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरात झालेल्या ६,३५१ चाचण्यांमधून ८०६, तर ग्रामीणमध्ये झालेल्या २,६२३ चाचण्यांमधून ५७९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात जिल्हाबाहेरील ४४ रुग्णांची भर पडली. आज शहरातील २ रुग्णांचा जीव गेला. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,९६,५३२ व मृतांची संख्या ६,०११, ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या १,६५,९१६ व मृतांची संख्या २,६२० झाली असून, जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या ९,५७६, तर मृतांची संख्या १६५७ वर पोहोचली आहे.

-मेडिकलमध्ये ६८, तर एम्समध्ये ४३ रुग्ण

सध्या नागपूर जिल्ह्यात १४,६०४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील १२,६५१ होम क्वारंटाइन, तर १,९५३ रुग्ण शासकीय, खासगी रुग्णालयांसह संस्थात्मक विलगीकरणात आहेत. यातील ६८ रुग्ण मेडिकलमध्ये, ४३ रुग्ण एम्समध्ये, तर २८ रुग्ण मेयोमध्ये भरती आहेत. कोरोनाचा या लाटेत २४ जानेवारी रोजी पॉझिटिव्हिटीचा दर ४४ टक्क्यांवर पोहोचला होता. आज तो १६ टक्क्यांवर आला आहे.

:: कोरोनाची रविवारची स्थिती

दैनिक चाचण्या : ८,९७४

शहर : ८०६ रुग्ण व ०२ मृत्यू

ग्रामीण : ५७९ रुग्ण व ०० मृत्यू

बाधित रुग्ण : ५,७२,०२४

सक्रिय रुग्ण :१४,६०४

बरे झालेले रुग्ण : ५,४७,१३२

एकूण मृत्यू : १०,२८८

Web Title: 61% covid-19 patients in nagpur district were completely healed in past 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.