६२ सुवर्णपदके विजेती पृथ्वी दहावीतही १०० टक्के सक्सेस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 10:57 PM2018-06-09T22:57:20+5:302018-06-09T22:58:27+5:30

म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र बदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिंगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे.

62 gold medalists win 100% of the World Tenth | ६२ सुवर्णपदके विजेती पृथ्वी दहावीतही १०० टक्के सक्सेस!

६२ सुवर्णपदके विजेती पृथ्वी दहावीतही १०० टक्के सक्सेस!

Next
ठळक मुद्देखेळासोबत शिक्षणातही भरारी : सैन्यात जाऊन वैद्यकीय सेवा करायचे ध्येय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र बदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिंगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे.
शहरात मार्शल आर्टची नॅशनल प्लेअर म्हणून पृथ्वी अनिल राऊत प्रसिद्ध आहे, कारण तिची खेळातील भरारी नेत्रदीपक आहे. वयाच्या अडीच वर्षापासून पृथ्वी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेत आहे. मार्शल आर्टच्या सहा राष्ट्रीय स्पर्धा, बॉक्सिंगमध्येही राज्यस्तरावर यशस्वी वाटचाल. उत्कृष्ट जलतरणपटू, संगीत क्षेत्रात विशारदकडे वाटचाल, जे.एन. टाटा पारसीची स्कूल प्रेसिडंट, अवघ्या १५ ते १६ व्या वर्षात ६२ मेडल, हे यशाचे वलय तिच्या पाठीशी लागले आहे. आता तर दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवीत स्वत:ला आॅलराऊंडर सिद्ध केले आहे. परीक्षेच्या तोंडावर अंदमान-निकोबारला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत दुसरे स्थान पटकाविले आहे. दहावीचे वर्ष असतानाही पृथ्वीने खेळाकडे दुर्लक्ष केले नाही. पहाटे उठून रनिंग करणे, सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत शाळा, त्यानंतर ६ ते ७ खासगी शिकवणी आणि ७ ते ९ प्रॅक्टिस अशी तिची दिनचर्या वर्षभर होती. शाळेत शिकविलेले रात्री वाचणे आणि होमवर्क पूर्ण करणे हाच तिचा अभ्यास. शाळेला कधी खंड पाडला नाही. उलट स्कूल प्रेसिडंट असल्यामुळे प्रत्येक उपक्रमात तिचा सहभाग असायचा. पण अंदमानहून नॅशनल खेळून आल्यानंतर एक महिना तिने झपाटून अभ्यास केला. शाळेतील मीना देवनानी, अबान भंगारा आणि सीमा जोशी याचबरोबर रवींद्र गायकी यांचे मार्गदर्शन मिळाल्याने ती शिक्षणातही यशस्वी होऊ शकली. पृथ्वीवर तिची आजी मीराबाई यांचे खूप प्रेम आहे. आजीची इच्छा तिला सैन्यात पाठविण्याची आहे. त्यासाठी पृथ्वीने वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचे निश्चित केले आहे. भारतीय सेनेला वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी ‘एएफएमसी’ कॉलेजमधून तिला एमबीबीएस करायचे आहे.
 खेळण्यामुळे आत्मविश्वास वाढला. टेन्शन आणि भीती माझ्यातून निघून गेली आहे. खेळण्यातून मिळालेल्या ऊर्जेमुळे माझे ध्येय मी गाठू शकणार आहे.
पृथ्वी राऊत
 माझी मुलगी कुठल्याच क्षेत्रात कमी नाही. जे ध्येय तिने ठरविले आहे ते आपल्या जिद्दीवर नक्कीच पूर्ण करेल. माझी मुलगी देशाच्या कामी यावी, अशी माझीही इच्छा आहे.
वंदना राऊत, पृथ्वीची आई

Web Title: 62 gold medalists win 100% of the World Tenth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.