६.२६ लाखाचे साहित्य पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:32+5:302021-03-25T04:08:32+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : चाेरट्याने कंपनीच्या आवारात प्रवेश करीत आतील विजेच्या ट्रान्सफॉर्मरची ताेडफाेड करून त्यातील तांब्याच्या तारांसह इतर ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : चाेरट्याने कंपनीच्या आवारात प्रवेश करीत आतील विजेच्या ट्रान्सफॉर्मरची ताेडफाेड करून त्यातील तांब्याच्या तारांसह इतर इलेक्ट्रिक साहित्य चाेरून नेले. या साहित्याची एकूण किंमत ६ लाख २६ हजार रुपये आहे. ही घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी शिवारात रविवारी (दि. २१) मध्यरात्री घडली.
अरविंदकुमार देवकरण ठक्कर (८३, रा. वर्धमान नगर, नागपूर) यांची सावळी शिवारात किंग रायडर नामक कंपनी आहे. कंपनीच्या आवारात कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने आत प्रवेश केला. यात त्याने विजेचे ट्रान्सफॉर्मर फाेडून त्यातील १ लाख ८० हजार रुपयांच्या ९०० किलाे तांब्याच्या तारा, ७२ हजार रुपये किमतीच्या विविध अश्वशक्तीच्या खड्डा मशीन, टायर बफरिंग मशीन, सरेल्युशन मिक्सिंग मशीन, टायर मशीन, टायर ग्राईंडर गिअर बाॅक्मस मशीन, लेथ कटिंग मशीनला लावलेल्या माेटारी, १ लाख ५० हजार रुपयांच्या दाेन कुलिंग हिट एक्सचेंज मशीन, २० हजार रुपयांचे टिल्लू पंप व इन्व्हर्टर, १८ हजार रुपयांचा इलेक्ट्रिक माेटरपंप, २० हजार रुपयांच्या टायर फिक्सिंग मशीन, आठ हजार रुपयांचा इलेक्ट्राॅनिक काटा, पाच हजार रुपयांचा साधा काटा, ३० हजार रुपयांचे तांब्याचे काॅईल, २० हजार रुपयांची सेक्टर मशीन आणि एक लाख रुपयांचे पॅनल मशीनचे साहित्य असा एकूण ६ लाख २६ हजार रुपये मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब साेमवारी (दि. २२) सकाळी उघडकीस आल्यानंतर अरविंदकुमार ठक्कर यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी अज्ञात आराेपीपीविरुद्ध भादंवि ३८०, ४६१ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनटक्के करीत आहेत.