महामेट्रोच्या हिंगणा मार्गावर ६५ टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 11:37 PM2018-06-30T23:37:52+5:302018-06-30T23:39:17+5:30
महामेट्रोच्या चारही मार्गावर बांधकाम वेगात सुरू आहे. रिच-१ प्रमाणेच हिंगणा मार्गावरील रिच-३ कॉरिडोरचे बांधकाम वेगात सुरू असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंतच्या १०.३ कि.मी. लांबीच्या या मार्गावर एकूण १० स्टेशन बांधण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या चारही मार्गावर बांधकाम वेगात सुरू आहे. रिच-१ प्रमाणेच हिंगणा मार्गावरील रिच-३ कॉरिडोरचे बांधकाम वेगात सुरू असून ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे. सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्यनगरपर्यंतच्या १०.३ कि.मी. लांबीच्या या मार्गावर एकूण १० स्टेशन बांधण्यात येत आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एमआयडीसीमुळे रिच-३ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाºया काळात मेट्रो फायदेशीर ठरणार आहे. सध्या याठिकाणी वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे. या भागात मेट्रोच्या कार्याला नागरिकांचे सहकार्य मिळत आहे. रिच-३ मार्गावर आतापर्यंत एकूण ५६४ पाईल्सपैकी ५०४ चे काम पूर्ण झाले आहे. २६९ ओपन फाऊंडेशनपैकी २५६, एकूण १२९ पाईल कॅपपैकी ९६, ३३७ व्हायाडक्ट पियरपैकी २६३ आणि एकूण ६१ स्टेशन कॉन्क्रिट पियरपैकी ४९ चे काम पूर्ण झाले आहे.