"६५ टक्के पुरुषांना नपुंसकतेचा धोका; 'जीन एडिटिंग'द्वारे समस्या दूर करण्याचा प्रयत्न" 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 07:18 AM2023-01-05T07:18:11+5:302023-01-05T07:19:25+5:30

जीवनशैली, व्यसनाधीनता, ड्रग्स अॅडिक्शन, उशिरा लग्न, बराच काळ बैठेकाम करणे आदी कारणांमुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरली आहे. 

65 percent of men are at risk of impotence - Dr. Pradeep Kumar | "६५ टक्के पुरुषांना नपुंसकतेचा धोका; 'जीन एडिटिंग'द्वारे समस्या दूर करण्याचा प्रयत्न" 

"६५ टक्के पुरुषांना नपुंसकतेचा धोका; 'जीन एडिटिंग'द्वारे समस्या दूर करण्याचा प्रयत्न" 

googlenewsNext

- आनंद डेकाटे

नागपूर : प्रजननासंबंधीची समस्या ही जागतिक समस्या झाली आहे. जगातील ६५ टक्के पुरुषांना नपुंसकतेचा धोका आहे. १५ टक्के पुरुष हे नपुंसकतेने ग्रस्त आहेत. या १५ टक्के लोकांपैकी बाळ होण्याची इच्छा असलेले केवळ ८ ते १० टक्के लोकच यशस्वी होतात, तर उर्वरित ९० टक्के लोक अपयशी ठरतात. पुढील १५ ते २० वर्षांत प्रजननाचा दर झपाट्याने कमी होईल, अशी धक्कादायक बाब त्रिवेंद्रम, केरळ येथील राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटर फॉर थारक्वॉडचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. प्रदीप कुमार यांनी निदर्शनास आणून दिली.

इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले असता 'लोकमत'शी त्यांनी विशेष संवाद साधला. डॉ. प्रदीप कुमार यांनी सांगितले की, काही पुरुषांमध्ये शुक्राणू नाहीत. काहींमध्ये आहेत, पण अॅक्टिव्ह नाहीत. काहींचे शुक्राणू सक्रिय आहेत, पण महिलांच्या बीजाणूंसोबत संयोग करू शकत नाही. काही संयोग करतात, मात्र प्रजननक्षम राहिलेले नाहीत. जीवनशैली, व्यसनाधीनता, ड्रग्स अॅडिक्शन, उशिरा लग्न, बराच काळ बैठेकाम करणे आदी कारणांमुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरली आहे. 

काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या देशात नपुंसकत्वाची समस्या इतकी गंभीर नव्हती; परंतु आपल्या देशातही ती वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा ही समस्या अतिशय  गंभीरतेने घेतली आहे. हा अभ्यास बराच पुढे गेला असून, २०२४ मध्ये उंदीर व माकडांवर याची यशस्वीपणे चाचणी पार पडेल. इतकेच नव्हे तर आयसीएमआरच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष मनुष्यावर याचा प्रयोग सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रजननाशी संबंधित २५ हजारांवर जनुके असतात. काही जनुके प्रोटीन तयार करतात. त्यात काही त्रुटी आहेत का? मोलिक्युलर समस्या आहे का? ही समस्या औषधाने दूर होईल का? याचा अभ्यास किंवा दूर जीन एडिटिंगद्वारे समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- डॉ. प्रदीप कुमार
 

Web Title: 65 percent of men are at risk of impotence - Dr. Pradeep Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.