तीन तासात ६६.७ मिमी पावसाची नाेंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:32+5:302021-07-10T04:07:32+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर गुरुवारी (दि. ८) सकाळी रामटेक तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या तीन ...

66.7 mm of rainfall in three hours | तीन तासात ६६.७ मिमी पावसाची नाेंद

तीन तासात ६६.७ मिमी पावसाची नाेंद

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : पंधरवड्याच्या विश्रांतीनंतर गुरुवारी (दि. ८) सकाळी रामटेक तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या तीन तासात संपूर्ण तालुक्यात सरासरी ६६.७ मिमी तर आजवर (गुरुवारपर्यंत) सरासरी ३४८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाच्या राेवणीची व त्यासाठी आवश्यक असलेल्या चिखलणीची पूर्वतयारी सुरू केली आहे.

महसूल विभागाच्या रामटेक मंडळात गुरुवारी ७५ मिमी तर एकूण ३९४ मिमी, देवलापार मंडळात २६ मिमी तर एकूण २६२ मिमी, नगरधन मंडळात ८२ मिमी तर एकूण ४०९ मिमी आणि मुसेवाडी मंडळात ८३ मिमी तर एकूण ३५८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. जंगलव्याप्त व सिंचनाच्या सुविधांचा अभाव असलेल्या देवलापार मंडळात मात्र कमी पावसाची नाेंद करण्यात आली.

या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश भागातील धानाच्या बांध्या तुडुंब भरल्या असून, हा पाऊस राेवणीयाेग्य असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अनेकांनी राेवणीची पूर्वतयारी सुरू केली असून बांध्यांमध्ये ट्रॅक्टरद्वारे चिखलणी करायला सुरुवात केली आहे. राेवणीला सुरुवात झाल्यास आठवडाभरात तालुक्यातील ५० टक्के राेवणी पूर्ण हाेणार असल्याचेही जाणकार धान उत्पादकांनी सांगितले.

...

मासाेळ्या पकडण्यावर भर

या पावसामुळे तालुक्यातील नदीनाले दुथडी भरून वाहायला सुरुवात झाली. खिंडसी जलाशयातील मासाेळ्या नदीच्या पात्रात वाहात असल्याने काेळी बांधवांनी सूर नदीच्या मासाेळ्या पकडण्यासाठी गर्दी केली हाेती. परिणामी, त्यांनी शुक्रवारी (दि. ९) रामटेक शहरातील बाजारात ५ ते २० किलाे वजनाच्या मासाेळ्या विकायला आणल्या हाेत्या. त्यांचे दरही नेहमीपेक्षा कमी हाेते. या पावसामुळे खिंडसी जलाशयातील पाण्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली. शिवाय, पेंच जलाशयाचे एक गेट ०.१५ मीटरने उघडण्यात आले हाेते.

Web Title: 66.7 mm of rainfall in three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.