६७१ नागरिकांनी घेतला लसीचा दुसरा डाेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:08 AM2021-04-24T04:08:27+5:302021-04-24T04:08:27+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : तालुक्यातील विविध केंद्रांवर काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात २० ...

671 citizens took the second dose of vaccine | ६७१ नागरिकांनी घेतला लसीचा दुसरा डाेस

६७१ नागरिकांनी घेतला लसीचा दुसरा डाेस

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : तालुक्यातील विविध केंद्रांवर काेराेना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात २० एप्रिलपर्यंत तालुक्यातील १६,५२६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, दुसऱ्या टप्प्यात ६७१ नागरिकांना याच लसीचा दुसरा डाेस देण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के व तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार यांनी संयुक्तरीत्या दिली असून, लस हा काेराेना संक्रमण राेखण्यासाठी प्रभावी उपाय असल्याचे या दाेन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले.

तालुक्यातील घाेटी उपकेंद्रात चार तर शिवनी (भाेंडकी) उपकेंद्रात तिघांचे लसीकरण करण्यात आले. रामटेक तालुक्यात काेराेना लसीकरणाला साधारणत: १ मार्चपासून सुरुवात करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार तालुक्यातील ३५,७९३ नागरिक या लसीसाठी पात्र ठरले. मात्र, २० एप्रिलपर्यंत १६,५२६ नागरिकांनी पहिला तर ६७१ नागरिकांनी दुसरा डाेस घेतला. यात रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील पहिल्या डाेसच्या ४,०९५ व दुसऱ्या डाेसच्या ५०० लाभार्थ्यांचा समावेश आहे. लसीचा पहिला डाेस घेतल्यानंतर संबंधितांना ४५ दिवसानंतर दुसरा डाेस देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला हाेता.

रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयासाेबतच तालुक्यातील पाच प्राथमिक आराेग्य केंद्र आणि त्याअंतर्गत येणाऱ्या ११ उपकेंद्रांमध्ये या लसीकरणाची साेय करण्यात आली आहे. यात एकूण १७,१९८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. नगरधन प्राथमिक आराेग्य केंद्रात एकूण ३,३४४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, यात नगरधन येथील २,८६०, काचूरवाही उपकेंद्रातील ३४३, डाेंगरी उपकेंद्रातील ६९ तर चिचाळा उपकेंद्रातील ७२ नागरिकांचा समावेश आहे. मनसर प्राथमिक आराेग्य केंद्रात एकूण ३,८५८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, यात मनसर येथील २,०५१, खैरी बिजेवाडा उपकेंद्रातील ३९७, खुमारी ४१० तर खासगी दवाखान्यातील ३५२ नागरिक आहेत.

हिवराबाजार प्राथमिक आराेग्य केंद्रात एकूण २,३०० नागरिकांनी लस घेतली. यात हिवराबाजार येथील १,०३९, दाहाेदा उपकेंद्रातील १७९, बेलदा उपकेंद्रातील २८५, पथरई उपकेंद्रातील ३८५, सीतापूर उपकेंद्रातील २३७ व घाेटी उपकेंद्रातील चार नागरिकांचा समावेश आहे. करवाही प्राथमिक आराेग्य केंद्रात १,०६१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून, यात वडंबा उपकेंद्रातील ३४७, भंडारबाेडी प्राथमिक आराेग्य केंद्रातील २,५०४, भंडारबाेडी येथील १,९०१, महादुला उपकेंद्रातील २१५, मुसेवाडी उपकेंद्रातील ३८५ व शिवनी (भाेंडकी) उपकेंद्रातील तीन नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

...

काेराेना रुग्णसंख्येत वाढ

रामटेक तालुक्यातील काेराेना रुग्णसंख्येत वाढ हाेत आहे. त्यातच उपचारासाठी शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. शिवाय, ग्रामीण भागात प्रशासकीय यंत्रणा ताेकडी पडत आहे. त्यामुळे हे संक्रमण राेखण्यासाठी नागरिकांनी काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे काटेकाेर पालन करणे आणि लस घेणे अत्यावश्यक आहे. काेराेना प्रतिबंधक लस सुरक्षित व प्रभावी असून, नागरिकांना काेणत्याही अफवा अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता, न घाबरता डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करवून घ्यावे तसेच इतरांना लस घेण्यास प्रेरित करावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार व खंडविकास अधिकारी प्रदीप ब्रम्हनाेटे यांनी केले आहे.

Web Title: 671 citizens took the second dose of vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.