१४ बँकांना ६८०० कोटी रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:09 AM2018-05-22T01:09:32+5:302018-05-22T01:09:32+5:30
विनसम समूह : एसएलसीचा दुरुपयोग करून फसवणूक
नागपूर : विजय मल्ल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्जबुडव्या विनसम समूहाच्या जतीन मेहताने १५ भारतीय बँकांना ६८०० कोटी रुपयांचा फटका कसा दिला, ते आता समोर आले आहे.
बँक आॅफ इंडियाच्या नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या एका जनरल मॅनेजरने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला जी माहिती दिली ती धक्कादायक आहे. या अधिकाºयाच्या मते जतीन मेहताने योजनाबद्ध पद्धतीने बँकांकडून स्टँडबाय लेटर आॅफ क्रेडिट (एसएलसी)च्या माध्यमातून ही कर्जे काढली आहेत.
एसएलसीद्वारे फसवणूक
विनसम डायमंड्स व फॉरएव्हर डायमंड्स या कंपन्यांनी विदेशातील बुलीयन बँक्स सोने व्यापाºयांच्या नावाने एसएलसी जारी करवून घेतल्या व त्यामार्फत सोने आयात केले व त्याचे दागिने बनवून संयुक्त अरब अमिरातीमधील व्यापाºयांना निर्यात केले. या एसएलसीच्या अटीमध्ये निर्यात केलेल्या दागिन्यांची रक्कम कंपन्यांना मिळाल्यानंतर कर्जफेड केली जाईल, अशी अट होती. अशाप्रकारे या दोन्ही कंपन्यांनी १५ बँकांकडून ६८०० कोटींचे कर्ज २०१० ते २०१२ दरम्यान घेतले व नंतर हात वर केले. आम्ही ज्या व्यापाºयांना दागिने निर्यात केले होेते त्या व्यापाºयांना सोन्याच्या सट्टाबाजारात नुकसान आले. त्यामुळे त्यांनी आम्हाला पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही बँकांची कर्जफेड करू शकत नाही, असा युक्तिवाद दोन्ही कंपन्यांनी केला. करारातील अटीमुळे बँकांनी या कंपन्यांकडून कर्जवसुली केली नाही.
जतीन मेहता व त्याचे सर्व कुटुंबीय कॅरेबियन आयलँड्समधील सेंट किट्सचे नागरिक आहेत. २०१३ साली ते भारतातून पसार झाले. पण या १५ भारतीय बँकात बँक आॅफ इंडियासुद्धा आहे का? या प्रश्नावर संबंधित अधिकाºयाने उत्तर देण्यास नकार दिला. दरम्यान, बँकांनी तक्रार केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून सीबीआय व प्रवर्तन निदेशालय (ईडी) या प्रकरणाची चौकशी करत असून संयुक्त अरब अमिरातीमधील बँकांनी तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
नेमका घोटाळा कसा घडला?
विनसम समूहाच्या दोन कंपन्या आहेत. विनसम डायमंड्स अॅण्ड ज्वेलरी व फॉरएव्हर डायमंड्स. या दोन्ही कंपन्या हिरेजडीत दागिन्यांचा व्यवसाय करत होत्या. त्यासाठी त्या सोने विदेशातून आयात करत होत्या व भारतात दागिने बनवून निर्यात करत होत्या. या कंपन्यांनी सोने आयात करण्यासाठी बँकांकडून ६८०० कोटींची कर्जे एसएलसीमार्फत घेतली व ती बुडवून १५ बँकांना चुना लावला, अशी माहिती या अधिकाºयाने दिली.