६८ हजाराचे बांधकाम साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:32+5:302021-07-05T04:07:32+5:30
खापरखेडा : बांधकाम करण्यासाठी प्लाॅटवर ठेवलेले लाेखंडी बांधकाम साहित्य अज्ञात चाेरट्याने चाेरून नेले. त्या साहित्याची किंमत ६८ हजार ६०० ...
खापरखेडा : बांधकाम करण्यासाठी प्लाॅटवर ठेवलेले लाेखंडी बांधकाम साहित्य अज्ञात चाेरट्याने चाेरून नेले. त्या साहित्याची किंमत ६८ हजार ६०० रुपये आहे. ही घटना खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेगली येथे शुक्रवारी (दि.२) दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
दीपक राजदेव पांडे (३७, रा. गाेटफार्म, प्लाॅट नं. ५४, गाेधनी राेड, बापूनगर, झिंगाबाई टाकळी, नागपूर) यांनी सदर खाली प्लाॅटवर बांधकाम करण्याकरिता साहित्य ठेवले हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने तेथील ६५ नग लाेखंडी प्राेफाईल शीट किंमत २६ हजार रुपये, १२ फुटाचे ५५ लाेखंडी अँगल किंमत २० हजार रुपये, १५० लाकडी बल्ल्या व ३० सिमेंट पाेल असे एकूण ६८ हजार ६०० रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चाेरून नेले. याप्रकरणी दीपक पांडे यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस हवालदार नावेद खान करीत आहेत.