नागपूर शहरात आढळले डेंग्यूचे ६९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 01:34 AM2018-09-07T01:34:54+5:302018-09-07T01:36:15+5:30
नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. महापालिके च्या दहा झोनच्या कार्यक्षेत्रात ९२१ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी ६९ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरातील २६५ रुग्णालय आणि ९५ प्रयोगशाळांतून ही माहिती प्राप्त झाली आहे. गुरुवारी महापालिक मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. महापालिके च्या दहा झोनच्या कार्यक्षेत्रात ९२१ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळलेले आहेत. त्यापैकी ६९ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. शहरातील २६५ रुग्णालय आणि ९५ प्रयोगशाळांतून ही माहिती प्राप्त झाली आहे. गुरुवारी महापालिक मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
डेंग्यूची लागण झाल्याच्या अनेक तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत आहेत. नगरसेवक याबाबत अधिकाºयांना जी माहिती देतात, त्यावर तातडीने उपाययोजना अधिकाऱ्यांनी करावी. संपूर्ण शहरभर सातत्याने फवारणी, र्फाॅगिंग करावे. डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कडक पावले उचलण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी बैठकीत दिले. मात्र आरोग्य विभागात मनुष्यबळाची कमतरता असल्याने निर्देशाचे पालन कसे करावे, असा प्रश्न आरोग्य विभागातील अधिकाºयांना पडला आहे.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक प्रवीण दटके, नगरसेवक सुनील अग्रवाल, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे आणि झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
प्रत्येक झोनमध्ये आरोग्य विभागात किती कर्मचारी आहेत, फवारणी दररोज होते की नाही, आतापर्यंत किती फवारणी केली, डेंग्यूची निर्मिती करणाºया अळ्या आहेत का, यासाठी किती घरांची तपासणी केली, किती घरांना भेटी दिल्या याबाबतचा झोननिहाय आढावा महापौरांनी घेतला.
दरम्यान, बाभूळवन येथील दौरा केला असता तेथे पाण्याच्या टाकीचे ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याचे आढळून आले. परिसरातील एका औषध कंपनीमुळे तेथील नागरिकांना प्रचंड मनस्ताप होतो आहे. रहिवासी क्षेत्रात अशी कंपनी कशी असू शकते, असा सवाल करीत तातडीने त्याचा अहवाल सादर करा, असेही निर्देश महापौरांनी दिले
पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या चमूने तपासणी केली. घरांची पाहणी करून त्या घरात आणि परिसरात पुन्हा डेंग्यू (लारवी) अळीची पैदास होणार नाही यासाठी उपाययोजना सुरू असल्याची माहिती हत्तीरोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली.
कर्मचाऱ्यांची कमतरता
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणाच्या कामासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची माहिती पुढे आली आहे. महापौरांनी याचा आढावा घेऊन आवश्यक कर्मचारी तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
डेंग्यूच्या अळ्या आढळणाऱ्याची नावे वृत्तपत्रात द्या
डेंग्यूचा प्रकोप होऊ नये, यासाठी मनपातर्फे वेळोवेळी जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येतात. मात्र, तरीही नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. आता मनपाच्या तपासणी मोहिमेत ज्या घरांमध्ये लारवी आढळली, त्या व्यक्तींची नावेच वर्तमानपत्रात प्रकाशित करा, अशी सूचना पदाधिकाऱ्यांनी केली.
स्थायी समितीच्या बैठकीतही चर्चा
शहरात डेंग्यूचा वाढता प्रकोप विचारात घेता स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. डेंग्यूला आळा घालण्यासाठी साधनसामुग्री उपलब्ध करण्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले. तसेच जनजागृतीसाठी मराठी भाषेसोबचत हिंदी व उर्दू भाषेतही पत्रक प्रसिद्ध करण्याचे निर्देश त्यांनी दिले.