Corona Virus in Nagpur; यवतमाळ जिल्ह्यात ७ पॉझिटिव्ह; विदर्भातील संख्या ४६ वर गेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 06:07 PM2020-04-08T18:07:22+5:302020-04-08T18:20:07+5:30
कोरोनाची तपासणी करण्यसाठी यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या १३ नमुन्यांमधून ७ जणांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे धक्कादायक वृत्त आत्ताच हाती आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोनाची तपासणी करण्यसाठी यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या १३ नमुन्यांमधून ७ जणांचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचे धक्कादायक वृत्त आत्ताच हाती आले आहे.
मंगळवारी यवतमाळ जिल्ह्याून १३ नमुने नागपुरात तपासणी करिता आले होते. तसेच वाशिम जिल्ह्यातून ६ नमुने आले होते. यातील यवतमाळच्या नमुन्यामधून ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तर वाशिममधील नमुन्यांमधून १ जण कोरोनाबाधित असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.
बुधवारी वाढलेल्या या आकडेवारीमुळे आता विदर्भात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४६ वर गेली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी
नागपूर-१८
बुलडाणा-११
गोंदिया-१
चंद्रपूर-१
अमरावती-४
वाशिम-१
यवतमाळ-८
अकोला-२