७ हजार किलोचा ‘राम हलवा’ बनणार; लाखो रामभक्तांना देणार प्रसाद, भक्तांना उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:06 PM2024-01-10T12:06:01+5:302024-01-10T12:06:26+5:30
१२ हजार लिटरची बनवली कढई
बालाजी देवर्जनकर
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: प्रसादाचा शिरा म्हणजे तो मऊ, लुसलुशीत अन् तितकाच गोड. रामलल्लाच्या अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर ७००० किलोचा ‘राम हलवा’ तयार करणार आहेत. यासाठी विष्णू मनोहर यांनी १२ हजार लीटर क्षमतेची खास कढई बनवली असून, त्यात ते राममंदिर परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ‘राम हलवा’ तयार करणार आहेत.
या कढईत ७,००० किलो हलवा बनवता येतो. तो उचलण्यासाठी क्रेनची आवश्यकता असते. रामलल्लाला अर्पण केल्यानंतर हा प्रसाद सुमारे दीड लाख रामभक्तांना वितरित करण्यात येणार आहे.
भक्तांना उत्सुकता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासही इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे नागपूरकर विष्णूजींच्या हलव्याची लज्जत प्रसादाच्या रुपातून देशाच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या रामभक्तांना मिळणार आहे.