७० क्विंटल चणा डाळ सडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:48+5:302021-05-07T04:09:48+5:30

नागपूर : डिजिटल इंडियावर असलेला भर आणि ऑनलाईन वर्किंग सुरू असलेल्या या काळात अन्न पुरवठा विभाग धान्यासंबंधित माहिती वेळेवर ...

70 quintals of gram dal rotted | ७० क्विंटल चणा डाळ सडली

७० क्विंटल चणा डाळ सडली

googlenewsNext

नागपूर : डिजिटल इंडियावर असलेला भर आणि ऑनलाईन वर्किंग सुरू असलेल्या या काळात अन्न पुरवठा विभाग धान्यासंबंधित माहिती वेळेवर पीओएस मशीनवर अपलाेड करू शकले नाहीत. यामुळे मागील वर्षी मिळालेली चणा डाळ खराब झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात रेशन दुकानदारांना दिलेली चणा डाळ खराब निघाली होती. जवळपास ७० क्विंटल डाळ परत पाठविण्यात आली होती. ती आताही गोदामात पडली असून, सडली आहे. त्या डाळीच्या बदल्यात अद्यापही दुकानदारांना चांगली डाळ पुरविण्यात आलेली नाही. यावर्षी एप्रिल महिन्यातसुद्धा धान्यवाटपात बराच विलंब झाला. या विलंबामुळे अन्य सर्वच प्रक्रियेवर परिणाम पडला आहे. पुरवठ्याची साखळी खंडित झाल्याने कार्डधारकांना असुविधेचा सामना करावा लागतो. सध्या अद्याप तरी दुकानदारांपर्यंत ना चणा डाळ पोहचली, ना तूर डाळ!

Web Title: 70 quintals of gram dal rotted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.