महिनाभरात नागपूर विभागातील ७० रेल्वेस्थानकं चकाचक; विशेष स्वच्छता अभियान, सोमवारी होणार समारोप

By नरेश डोंगरे | Published: October 29, 2022 06:50 PM2022-10-29T18:50:00+5:302022-10-29T18:50:49+5:30

महिनाभरात नागपूर विभागातील ७० रेल्वेस्थानकं स्वच्छ करण्यात आली आहेत. 

 70 railway stations in Nagpur division have been cleaned within a month  | महिनाभरात नागपूर विभागातील ७० रेल्वेस्थानकं चकाचक; विशेष स्वच्छता अभियान, सोमवारी होणार समारोप

महिनाभरात नागपूर विभागातील ७० रेल्वेस्थानकं चकाचक; विशेष स्वच्छता अभियान, सोमवारी होणार समारोप

googlenewsNext

नागपूर: मध्य रेल्वेच्यानागपूर विभागाकडून महिनाभरात राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता अभियानांतर्गत या विभागातील ७० रेल्वेस्थानकं चकाचक करण्यात आली. २ ऑक्टोबर २०२२ पासून हे विशेष स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले होते. ३१ ऑक्टोबरला त्याचा समारोप होणार आहे. या अभियानांतर्गत नागपूर विभागातील वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले. दैनंदिन साफसफाईसोबतच प्रवाशांकडून टाकल्या जाणाऱ्या रिकाम्या बाटल्यांसाठी डस्टबिन, क्रशिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या. कचरा गोळा करणे आणि भंगार साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठीही विशेष उपाययोजना आखण्यात आल्या. 

अपर विभाग रेल्वे व्यवस्थापक पी. एस. खैरकार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानकं, रेल्वेची विविध कार्यालये आदींच्या सफाईवर विशेष लक्ष दिल्याने महिनाभरात हे सर्व चकाचक झाले. सोमवारी या अभियानाचा समारोप होणार असून, त्यानिमित्त ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांचे समुपदेशन
घाण-कचऱ्यामुळे होणारे प्रादुर्भाव आणि आजाराची कल्पना देऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अभियानाच्या प्रारंभी समुपदेशन करण्यात आले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीनेच रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कटाक्षाने काम करण्यात आले.
 

Web Title:  70 railway stations in Nagpur division have been cleaned within a month 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.