महा आवास अभियानात विभागात ७२८१८ घरे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:07 AM2021-06-18T04:07:49+5:302021-06-18T04:07:49+5:30
मुख्यमंत्र्यांपुढे झाला लाभार्थ्याचा ई-गृहप्रवेश नागपूर : २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान ग्रामीण ...
मुख्यमंत्र्यांपुढे झाला लाभार्थ्याचा ई-गृहप्रवेश
नागपूर : २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत नागपूर विभागात ७२८१८ घरकूल पूर्ण करण्यात आले. या योजनेच्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्र्यापुढे ई-गृहप्रवेश संपन्न झाला.
या योजनेंतर्गत अजूनही नागपूर विभागात १ लाख ३२ हजार ८७७ घरकुलांची कामे प्रगतिपथावर आहे. शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभागामार्फत योजनेत पूर्ण झालेल्या घरकुलास गृहप्रवेश सोहळ्याचे दुरस्थ प्रणालीद्वारे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समक्ष गृहप्रवेश झाला. विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात जि.प.च्या अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपायुक्त (विकास) अंकुश केदार, प्रकल्प संचालक विवेक इलमे, अमोल बाविस्कर आदी उपस्थित होते.