७.३१ लाख डिमांड वाटपाचे मनपाच्या मालमत्ता विभागापुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 07:41 PM2020-05-20T19:41:10+5:302020-05-20T19:43:31+5:30

महापालिकेच्या कर आकारणी व करवसुली विभागाला २०२०-२१ या वर्षातील डिमांड वाटप मार्च मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प असल्याने डिमांड छपाईला विलंब होत आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ७ लाख ३१ हजार ४२१ डिमांड वाटप करण्याचे आव्हान विभागापुढे उभे ठाकले आहे.

7.31 lakh Demand Distribution Challenge before Corporation Property Department | ७.३१ लाख डिमांड वाटपाचे मनपाच्या मालमत्ता विभागापुढे आव्हान

७.३१ लाख डिमांड वाटपाचे मनपाच्या मालमत्ता विभागापुढे आव्हान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या कर आकारणी व करवसुली विभागाला २०२०-२१ या वर्षातील डिमांड वाटप मार्च मध्ये सुरू होणे अपेक्षित होते. मात्र लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प असल्याने डिमांड छपाईला विलंब होत आहे. अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ७ लाख ३१ हजार ४२१ डिमांड वाटप करण्याचे आव्हान विभागापुढे उभे ठाकले आहे.
लॉकडाऊन संपताच महापालिकेच्या १० झोनमध्ये डिमांड वाटपाला सुरुवात केली जाणार आहे. वास्तविक मे पूर्वी कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ४ टक्के सवलत दिली जाते. परंतु यावर्षी अद्याप डिमांड वाटप करण्यात आलेले नाही. वित्त वर्षात ७,३१,४२१ मालमत्ताधारकांकडून २६१.६० कोटींची करवसुली केली जाणार आहे. पहिल्या सहामाहीत कर न भरल्यास २ टक्के शास्ती आकारली जाते. परंतु या वर्षात डिमांड वाटप झालेले नाही. त्यामुळे शास्ती आकारली जाणार नाही. डिमांड मिळाल्यानंतर डिसेंबरपूर्वी कर भरणाऱ्यांना ४ टक्के सवलत दिली जाणार आहे.
गेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापासून स्थायी समितीने ५५१ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. प्रत्यक्षात २४५ कोटी जमा झाले. लॉकडाऊनचाही काही प्रमाणात वसुलीला फटका बसला. नाहीतर हा आकडा २६५ ते २७० कोटी पर्यंत गेला असता. मागील वित्त वर्षात २३३.७३ कोटींच्या चालू वसुलीपैकी १२३.२८ कोटींची वसुली झाली. तर १२२ कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली. गेल्या वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीचाही करवसुलीवर परिणाम झाला. विभागातील कर्मचारी दोन महिने निवडणुकीच्या कामात व्यस्त होते.
वित्त वर्षात मनपा आयुक्तांच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करापासून २८९.४४ कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात हा आकडा ४५० कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. थकबाकी व नियमित वसुली विचारात घेता दिलेले उद्दिष्ट अवघड नाही.

डिसेंबरपर्यंत शास्ती नाही
लॉकडाऊनमुळे डिमांड वाटपाला विलंब होत आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत मालमत्ताधारकांना शास्ती लावली जाणार नाही. लॉकडाऊन संपताच डिमांड वाटप व करवसुलीच्या कामाला गती येईल, असा विश्वास मनपाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी व्यक्त केला.

Web Title: 7.31 lakh Demand Distribution Challenge before Corporation Property Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.