२४ तासात ७,४९६ नवे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:12 AM2021-04-30T04:12:26+5:302021-04-30T04:12:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाचा संसर्ग शहरात कायम असून गुरुवारी जारी झालेल्या अहवालानुसार २४ तासात जिल्ह्यात ७ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा संसर्ग शहरात कायम असून गुरुवारी जारी झालेल्या अहवालानुसार २४ तासात जिल्ह्यात ७ हजार ४९६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ८९ मृत्यूंची नोंद झाली. दिवसभरात ६ हजार ९८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.
गुरुवारी शहरात ४ हजार ४२२ तर ग्रामीणमध्ये ३ हजार ६७ रुग्ण आढळले. शहरात ४९, ग्रामीणमध्ये ३३ तर जिल्ह्याबाहेरील सात रुग्णांचा मृत्यू झाला.
२४ तासात शहरातील ४ हजार ५७६ तर ग्रामीणमधील २ हजार ४०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ७७ हजार ६२७ वर पोहोचली आहे. यात शहरातील ४६ हजार १५० रुग्णांचा समावेश आहे. ६० हजार ८९० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून १६ हजार ७३७ रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल आहेत.
२६ हजार नमुन्यांची तपासणी
गुरुवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकूण २६ हजार २१२ नमुन्यांची तपासणी झाली. यातील १९ हजार १२८ नमुने शहरातील होते. जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या २० हजार ८४८ चाचण्या झाल्या.