७५ टक्के मूल्यांकन पूर्ण, १२ वीचा निकाल लागणार मे अखेरीस

By आनंद डेकाटे | Published: April 12, 2024 03:02 PM2024-04-12T15:02:21+5:302024-04-12T15:05:53+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षांनंतर आता मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे.

75 percent assessment complete 12th result will be out by end of May | ७५ टक्के मूल्यांकन पूर्ण, १२ वीचा निकाल लागणार मे अखेरीस

७५ टक्के मूल्यांकन पूर्ण, १२ वीचा निकाल लागणार मे अखेरीस

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षांनंतर आता मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असतानाही मूल्यांकनाच्या कामावर परिणाम झालेला नाही. ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी सांगितले. बारावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षांची तयारी सुरू केली आहे. काही परीक्षा या महिन्यात होणार आहेत, काही मे महिन्यात. याचा अर्थ बोर्डाच्या परीक्षेतून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांनी पुन्हा प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आहे. बोर्डाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे. सुरुवातीला शिक्षकांनी मूल्यांकनावर बहिष्कार टाकला असला तरी नंतर त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली.

सध्या शिक्षकही निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. असे असतानाही मूल्यांकनाच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही. यावेळी इयत्ता १२ वी मधील १,६२,५१७ विद्यार्थी आणि १० वी मधील १,५४,७२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. नियमित वेळेवर परीक्षांचे निकाल जाहीर होतील, असे सांगितले जाते. त्यानुसार १२ वी चा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात आणि १० वी चे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील.

Web Title: 75 percent assessment complete 12th result will be out by end of May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.