नागपुरात पारपत्र बनविण्यासाठी असलेल्या गर्दीमध्ये ७५ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:35 PM2020-07-06T23:35:00+5:302020-07-06T23:35:01+5:30

सादिकाबाद येथील पासपोर्ट सेवा केंद्रात पूर्वी प्रमाणे आवेदकांची रांग दिसून आली नाही. केंद्राच्या प्रवेशद्वारावर चार-दोन लोकच उभे असल्याचे दिसत होते.

75% reduction in passport rush in Nagpur | नागपुरात पारपत्र बनविण्यासाठी असलेल्या गर्दीमध्ये ७५ टक्के घट

नागपुरात पारपत्र बनविण्यासाठी असलेल्या गर्दीमध्ये ७५ टक्के घट

Next
ठळक मुद्देपीएसकेमध्ये न्यून कर्मचारी संख्येत चालत आहे काम

वसीम कुरैशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलग तीन महिने ताळेबंदी नंतर पासपोर्ट कार्यालय आणि पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाले आहे. परंतु, पासपोर्ट बनविण्यासाठी आॅनलाईन अपॉइंटमेंट घेणाऱ्यांची संख्या ७५ टक्के ने घसरली आहे. सोमवारी केवळ १३५ अपॉइंटमेंट ची नोंदणी झाली. सादिकाबाद येथील पासपोर्ट सेवा केंद्रात पूर्वी प्रमाणे आवेदकांची रांग दिसून आली नाही. केंद्राच्या प्रवेशद्वारावर चार-दोन लोकच उभे असल्याचे दिसत होते.
कोविड-१९ प्रकोपाच्या काळात जिथे परदेशात फसलेले भारतीय परत येत आहेत, तेथे विदेशात जाण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्या कमी असल्याने पासपोर्ट बनविण्यासाठी लोक येत नसल्याचे प्रमुख कारण आहे. दीड वर्षापर्यंत अपॉइंटमेंट मिळविण्यासाठी वेटिंगची स्थिती असायची. त्या काळात पासपोर्ट बनविण्याच्या कामाचे विकेंद्रीकरणही झाले नव्हते. नंतर वर्धा सोबतच पोस्टाच्या काही कार्यालयात पासपोर्ट बनविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे, नागपुरातील 'पीएसके' मध्ये आवेदकांची संख्या ३० टक्के पर्यंत घसरली होती. तरी सुद्धा सरासरी दररोज ७०० आवेदक अपॉईंटमेंट घेत होते.

या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत पीएसके मध्ये पासपोर्ट बनविणाºयांची संख्या बºयापैकी होती. मात्र मार्च पासून ही संख्या रोडावण्यास सुरुवात झाली. याच महिन्याच्या दुसºया पंधरवड्यात ताळेबंदी मुळे कामकाज बंद करण्यात आले होते. त्यांनतर मे महिन्याच्या अखेर अखेर पर्यंत कामकाज सुरू करण्यात आले होते. पीएसके मध्ये आता रोज १०० ते १५० आवेदक पासपोर्ट बनविण्यासाठी पोहोचत आहेत. यातही बहुतांश लोक केवळ एक दस्ताऐवज म्हणूनच पासपोर्ट बनवत आहेत. तसेही नागपुरातून आंतरराष्ट्रीय उड्डानांवर सद्यस्थितीत बंदीच आहे.

हज आणि उमराह नसल्याने नुकसान
कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे यंदा मुस्लिम समाज हज यात्रेला जाऊ शकणार नाही. विशेष म्हणजे हज करिता वर्षभरात तिन हजाराहून अधिक पासपोर्ट बनविले जातात. याशिवाय प्रत्येक महिन्याला उमराह करिता जाणारे सरासरी २०० लोक पासपोर्ट बनवित असतात. पासपोर्ट द्वारे मिळणा?्या राजस्वात या दोन्ही यात्रांचे सहकार्य असते. ताळेबंदी पूर्वी पीएसकेमधून दररोज १२ ते १५ लाख रुपयांचे राजस्व प्राप्त होत होते. आता मात्र हा आकडा दोन लाखापर्यंत घसरल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आधी प्रमाणे ६ दिवसाच्या आत कोणत्याही तारखेलाच अपॉईंटमेंट चे निर्बंध आता नाही. आता जुलै महिन्याच्या कोणत्याही तारखेला अपॉईंटमेंट घेता येऊ शकते. तरी देखील इच्छुकांची संख्या रोडावलेलीच आहे.

आरोग्य सेतू नाही तर प्रवेश नाही!
सादिकाबाद येथील बºयाच अवेदकांना अपॉईंटमेंट मिळाल्यानंतरही रिकाम्या हाताने परत फिरावे लागल्याचे सांगण्यात येते. आवेदकांकडे मास्क, सॅनिटायजर, हातमोजे असणे गरजेचे आहे. शिवाय मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे बंधनकारक आहे. अशा वेळी ज्यांच्याकडे साधा मोबाईल असेल त्यांना अपॉईंटमेंट असतानाही प्रवेश दिला जात नाही. साध्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड होत नसल्याने अशा अवेदकांची पंचाईत होत आहे.

Web Title: 75% reduction in passport rush in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.