मुद्रा  बँक योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यात ७६९ कोटी कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 08:22 PM2018-02-03T20:22:22+5:302018-02-03T20:27:36+5:30

मुद्रा  बँक योजनेच्या माध्यमातून विविध व्यवसायासाठी शिशु, किशोर व तरुण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लक्ष ६३ हजार ५६६ अर्जदारांना विविध व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी ७५९ कोटी ७ लक्ष रुपये विविध बँकाद्वारे मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उद्योग सुरू करणाऱ्या अर्जदारांनी मुद्र्रा बँक योजनेंतर्गत प्रलंबित असलेले अर्ज एक महिन्याच्या आत निकाली काढावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्यात.

769 crore loan allocation in Nagpur district under the money bank scheme | मुद्रा  बँक योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यात ७६९ कोटी कर्ज वाटप

मुद्रा  बँक योजने अंतर्गत नागपूर जिल्ह्यात ७६९ कोटी कर्ज वाटप

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकारी सचिन कुर्वे : १ लक्ष ६३ हजार अर्जदारांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुद्रा  बँक योजनेच्या माध्यमातून विविध व्यवसायासाठी शिशु, किशोर व तरुण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लक्ष ६३ हजार ५६६ अर्जदारांना विविध व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी ७५९ कोटी ७ लक्ष रुपये विविध बँकाद्वारे मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील उद्योग सुरू करणाऱ्या अर्जदारांनी मुद्र्रा बँक योजनेंतर्गत प्रलंबित असलेले अर्ज एक महिन्याच्या आत निकाली काढावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिल्यात.
मुद्र्रा बँक योजनेच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी विविध बँकांनी मुद्रा बँक योजनेंतर्गत केलेल्या कर्ज पुरवठ्याचा आढावा घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, मुद्रा बँक योजना समितीचे सदस्य सचिव कृष्णा फिरके,डिक्कीचे निश्चय शेळके, लिड बँक व्यवस्थापक अयुब खान, श्रीराम बांधे उपस्थित होते.
मुद्रा बँक योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी व जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रथम स्वतंत्र सेल तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शिशु योजनेमध्ये १ लाख ५१ हजार ८४७ नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून सरासरी ३३ टक्के नागरिकांना नियमितपणे कर्जाची वसुली होत आहे. मागील वर्षी ८६४ कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी सुध्दा चांगले काम करावे, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.
२२ पासून युथ एम्पॉवरमेंट समिट
मुद्रा बँक कर्ज योजनेंतर्गत शिशु, किशोर व तरुण योजनेसोबत स्टॅन्डअप व स्टार्टअप या योजनेमध्ये युवकांना सहज व सुलभ कर्ज पुरवठा करण्यासाठी विविध बँकांनी युवकांसाठी कर्जमेळावे आयोजित करावे, अशी सूचना आमदार प्रा. अनिल सोले यांनी यावेळी केली. फार्च्यून फाऊंडेशनतर्फे येत्या २२ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात युथ एम्पॉवरमेंट समिट आयोजित करण्यात आली आहे. येथे किमान एक लाख युवक उपस्थित राहणार असून त्यांना मुद्रा बँक योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांनी आपले स्टॉल लावून युवकांना मुद्रा बँक योजने संदर्भात मार्गदर्शन करावे, अशी सूचना बँकेच्या अधिकाऱ्यांना केली.

Web Title: 769 crore loan allocation in Nagpur district under the money bank scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.