दहा महिन्यात ७७४ नवजात शिशूंचा मृत्यू

By Admin | Published: July 23, 2016 03:04 AM2016-07-23T03:04:04+5:302016-07-23T03:04:04+5:30

बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे.

774 Newborn infant deaths in 10 months | दहा महिन्यात ७७४ नवजात शिशूंचा मृत्यू

दहा महिन्यात ७७४ नवजात शिशूंचा मृत्यू

googlenewsNext

मेडिकलमध्ये सोयींअभावी वाढतेय शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण : रेफर केलेल्या बालकांसाठी ‘एनआयसीयू’च नाही

सुमेध वाघमारे नागपूर
बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. आरोग्यासाठी मोठा निधी देत आहे. ग्रामीण भागांत मृत्यूदर रोखण्यात शासनाला काही प्रमाणात यशही आले आहे, परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) चित्र याच्या उलट आहे. जानेवारी ते आॅक्टोबर २०१५ या दहा महिन्यांच्या कालावधीत ७७४ नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे. या चिमुकल्यांचा कोंडणाऱ्या श्वासामागे आवश्यक उपकरणांचा तुटवडा आणि अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेरून येणाऱ्या नवजात शिशूंसाठी नसलेले अतिदक्षता नवजात शिशू कक्ष (एनआयसीयू) हे कारण ठरत आहे.
विशेष म्हणजे, महानगरपालिकेकडे ‘एनआयसीयू’ कक्ष नाही. आरोग्य विभागाचे डागा रुग्णालयात ४३ खाटांचा विशेष नवजात शिशू कक्ष आहे. परंतु येथे ‘न्युओलेटर व्हेंटिलेटर’ व ‘टर्शिअरी केअर’ची सोय नसल्याच्या कारणांवरून अशा रुग्णाना मेडिकलमध्ये पाठविले जाते. परिणामी, विदर्भासह, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश आदी रुग्णांचा भार एकट्या मेडिकलवर पडत आहे.मेडिकलच्या बालरोग चिकित्साशास्त्र विभागांतर्गत वॉर्ड क्र. ३,५,६ व २० खाटांचे एनआयसीयु आहे. एकट्या मेडिकलमध्ये दिवसाकाठी ३०वर मुले जन्माला येतात. यातील कमी वजन व कमी दिवस किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या नवजात शिशूंना ‘एनआयसीयुमध्ये भरती केल्या जाते. येथे आवश्यक यंत्रसामुग्रीसोबतच चार न्युओलेटर व्हेंटिलेटरची सोय आहे.
परंतु मेयो किंवा इतर खासगी रुग्णालयातून कितीही गंभीर अवस्थेत नवजात शिशू आल्यास त्याला या कक्षामध्ये ठेवले जात नाही. त्याच्यावर सामान्य वॉर्डात उपचार केले जातात.

१०० खाटांचे असावे एनआयसीयू
मेडिकलवर वाढत्या रुग्णांचा भार लक्षात घेऊन आरोग्य विभागाने डागातील विशेष नवजात शिशु कक्षात आवश्यक सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. बाहेरून आलेले शिशु मेडिकलच्या ‘एनआयसीयू’मध्ये ठेवण्यासाठी शासनाने १०० खाटांची सोय करावी, असेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
१० न्युओलेटर व्हेंटिलेटरची गरज
मेडिकलच्या ‘एनआयसीयू’मध्ये मेडिकलमध्येच जन्माला आलेली नवजात बालके ठेवली जात असली तरी त्यांच्यासाठीही येथील खाटा कमी पडतात. अनेकवेळा एका खाटेवर दोन बालकांंवर उपचार केला जातो. याशिवाय अल्प उपकरणांमुळेही चिमुकल्यांच्या जीवावर बेतते. १० ‘न्युओलेटर व्हेंटिलेटर’ची गरज असताना येथे केवळ चारच आहेत. इतरही आवश्यक उपकरणांची संख्या कमी असून काही नादुरुस्त स्थितीत आहे.

Web Title: 774 Newborn infant deaths in 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.