५ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ७८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:07 AM2021-03-28T04:07:41+5:302021-03-28T04:07:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शनिवारी पार पडले. कोरोनाचे संकट असतानादेखील मतदारांमध्ये ...

78% turnout in West Bengal till 5 p.m. | ५ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ७८ टक्के मतदान

५ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ७८ टक्के मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शनिवारी पार पडले. कोरोनाचे संकट असतानादेखील मतदारांमध्ये उत्साह दिसून आला व सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३० जागांवर ७८ टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे राजकीय पक्षांमध्ये मंथन सुरू झाले आहे.

पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश होता. सर्व पक्ष व अपक्षांचे मिळून एकूण १९१ उमेदवार रिंगणात होते. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदारांची मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ७८ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याचा दावा निवडणूक अधिकाऱ्यांनी केला. सायंकाळी ६ वाजता मतदान संपले. २०१६ च्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ८० टक्क्यांच्या जवळपास मतदान झाले होते.

कडेकोट सुरक्षाव्यवस्था

निवडणूक सुरळीतपणे पार पडावी, यासाठी मतदान केंद्रांवर सीएपीएफच्या ७३० तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. तुरळक अपवाद वगळता आदिवासीबहुल जागांवर मतदान शांततेत पार पडले.

ईव्हीएमवर आक्षेप

दरम्यान, सकाळच्या सुमारास काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम चालत नव्हत्या. १०७ ईव्हीएमबाबत तक्रारी आल्या होत्या. तृणमूल काँग्रेसने ईव्हीएमवर आक्षेप घेतला व जाणूनबुजून असे प्रकार होत असल्याचा आरोप लावला.

असे झाले मतदान

एकूण जागा - ३०

मतदार - ७३,८०,४९२

उमेदवार - १९१

मतदान केंद्र - १०,२८८

मतदानाची टक्केवारी – ७८ टक्क्यांहून अधिक

Web Title: 78% turnout in West Bengal till 5 p.m.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.