रिसाेर्टमधून ७८ हजाराचे साहित्य पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:49+5:302021-07-02T04:07:49+5:30

रामटेक : अज्ञात चाेरट्याने रिसाेर्टच्या खाेलीमध्ये ठेवलेले नळ फिटिंगचे विविध साहित्य चाेरून नेले. त्या साहित्याची एकूण किंमत ७८ हजार ...

78,000 items were snatched from the resort | रिसाेर्टमधून ७८ हजाराचे साहित्य पळविले

रिसाेर्टमधून ७८ हजाराचे साहित्य पळविले

Next

रामटेक : अज्ञात चाेरट्याने रिसाेर्टच्या खाेलीमध्ये ठेवलेले नळ फिटिंगचे विविध साहित्य चाेरून नेले. त्या साहित्याची एकूण किंमत ७८ हजार ९०० रुपये आहे. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना राजकमल रिसाेर्ट येथे मंगळवारी (दि.२९) उघडकीस आली.

सदर रिसाेर्टच्या खाेलीचे कुलूप ताेडून चाेरट्याने आत प्रवेश केला. यात चाेरट्याने खाेलीमध्ये ठेवलेले नवीन जीआय पाईप, नळ फिटिंगचे साहित्य, लाेखंड कापण्याची मशीन, पाण्याचा विद्युत पंप, स्टाईल कटर मशीन व इतर असे एकूण ७८ हजार ९०० रुपये किमतीचे साहित्य चाेरून नेले. ही बाब कंत्राटदार जवाहर मनाेहर कुंभलकर (४५, रा. गाेधीनगर, तुमसर) यांच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी रामटेक पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी भादंवि कलम ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस हवालदार मनाेहर राऊत करीत आहेत.

Web Title: 78,000 items were snatched from the resort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.