किरनापूर येथे शेतात जुगार, ८ जणांना अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त 

By जितेंद्र ढवळे | Published: September 22, 2023 05:53 PM2023-09-22T17:53:41+5:302023-09-22T17:59:02+5:30

अरोली पोलिसांची कारवाई

8 arrested playing gambling at Kirnapur; Two lakh worth of goods seized | किरनापूर येथे शेतात जुगार, ८ जणांना अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त 

किरनापूर येथे शेतात जुगार, ८ जणांना अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त 

googlenewsNext

नागपूर : मौदा तालुक्यात किरनापूर येथील दूधाळा पांदन रस्त्याच्या बाजूला शेतात जुगार खेळणाऱ्या ८ जणांना अरोली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ९९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

किरनापूर-दुधाळा येथे काही नागरिक जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती अरोली पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबधित स्थळी धाड टाकून जुगार खेळणाऱ्यांना अटक केली. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून ११ हजार ८०० रुपये रोख, तास पत्ते, मोबाइल फोन, तीन मोटारसायकल असा एकूण १ लाख ९९ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध अरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Web Title: 8 arrested playing gambling at Kirnapur; Two lakh worth of goods seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.