लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर आठ महिने अत्याचार; आरोपी फरार
By योगेश पांडे | Published: November 5, 2023 03:49 PM2023-11-05T15:49:01+5:302023-11-05T15:49:21+5:30
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
नागपूर : कामाच्या निमित्ताने झालेली ओळख एका तरुणीला चांगलीच भोवली. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर आठ महिने अत्याचार केले. त्यानंतर लग्नाला नकार देऊन तो फरार झाला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अमन शिवकुमार शर्मा (२०, कृष्णानगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याची गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतच राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीशी कामाच्या निमित्ताने ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री झाली व अमनने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्नाचे वचन दिले व फेब्रुवारी २०२३ रोजी तिच्यावर पहिल्यांदा जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर सातत्याने तो तिच्यावर अत्याचार करत होता. तिने लग्नाबाबत विचारल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे द्यायचा. १५ ऑक्टोबर रोजी त्याने असाच प्रकार केला. तरुणीने त्याला लग्न करणार की नाही असे विचारल्यावर त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणीने त्याच्याविरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याला याची कुणकुण लागताच तो फरार झाला. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.