११ पैकी ८ आरोपींना अटक

By admin | Published: December 31, 2014 01:06 AM2014-12-31T01:06:58+5:302014-12-31T01:06:58+5:30

बिबट कातडेप्रकरणात वन विभागाच्या पथकाने आजवर एकूण ११ पैकी ८ आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे यास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या

8 out of 11 accused were arrested | ११ पैकी ८ आरोपींना अटक

११ पैकी ८ आरोपींना अटक

Next

बिबट कातडेप्रकरण : तिघांचा शोध सुरू, सौद्यात स्थानिकांनी केली गुंतवणूक
भिवापूर : बिबट कातडेप्रकरणात वन विभागाच्या पथकाने आजवर एकूण ११ पैकी ८ आरोपींना अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावण वाघमारे यास अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपींना अटक केली असल्याचे उमरेड (दक्षिण)चे वन परिक्षेत्र अधिकारी एन. सी. गोसावी यांनी सांगितले. बिबट कातडे खरेदीत काही स्थानिकांनी गुंतवणूक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रणजितसिंग ज्युनी रा. कच्च्छेपार, जिल्हा चंद्रपूर याला घटनेच्या दिवशी तर सरबजीत सिंग रा. पवनवार जिल्हा चंद्रपूर, श्रावण वाघमारे रा. भिवापूर व शंकर गायकवाड रा. तास, ता. भिवापूर या तिघांना काही दिवसांनी अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रावणने दिलेल्या माहितीच्या आधारे शनिवारी संजय फत्तू बागडे रा. भिवापूर, मंगेश लिंगायत व महादेव वाणी दोघेही रा. भुयार, जिल्हा भंडारा आणि किशोर वाणी रा. चांपा या चौघांना वन विभागाच्या पथकाले अटक केली.
वन विभागाच्या नागपूर येथील विशेष पथकाने १२ सप्टेंबरला स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात रणजितसिंग ज्युनी याला बिबट्याच्या कातड्यासह अटक केली होती. त्त्यावेळी अन्य आरोपी पसार झाले होते. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी याच परिसरातील अभय विश्वेकर यांच्या शेतात पुन्हा बिबटाचे कातडे आढळूल आले. दरम्यान, रणजितसिंगकडून श्रावण वाघमारे याचे नाव पुढे आल्याने त्याला ९ डिसेंबरच्या दुपारी चंद्रपूर जिल्ह्यातील साठगाव शिवारातील कुंडलिक मोईनकर यांच्या शेतात सापळा रचून अटक केली.
त्यावेळी श्रावणचा साथीदार प्रशांत जांभूळकर हा पळून गेला होता. सदर दोन्ही कातडे पवनपार येथील सरबजितसिंगकडून आणल्याची माहिती श्रावणने देताच ९ डिसेंबरच्या मध्यरात्री सरबजितला चंद्रपूर जिल्ह्यातील पवनपार येथून अटक केली. ही शिकार आपल्या वडिलाने केल्याची माहिती सरबजितसिंगने वन अधिकाऱ्यांना दिली. त्याचे वडील व्यसनी असल्याने ही शिकार सरबजितनेच केली असावी अशी शक्यता वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. रणजितसिंग व सरबजितसिंह हे दोघे चुलते-पुतणे होत. ही कारवाई वन्यजीवचे वन परिक्षेत्र अधिकारी जी. एफ. लुचे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. श्रावण वाघमारेला बोलते केल्यानंतर वन अधिकाऱ्यांना नवीन माहिती मिळाली. बिबट कातड्याच्या सौद्यात बाहेरील आरोपींसह तीन स्थानिक तरुणांनी रक्कम गुंतविली असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाली आहे. या तिघांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास वनपरिक्षेत्र अधिकारी एन. सी. गोसावी यांनी व्यक्त केला. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 8 out of 11 accused were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.