विकासासाठी आठ हजार कोटींचा निधी

By admin | Published: September 13, 2016 02:35 AM2016-09-13T02:35:17+5:302016-09-13T02:35:17+5:30

नागपूरसह विदर्भातील लाखो लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दिशेने केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व

8 thousand crores fund for development | विकासासाठी आठ हजार कोटींचा निधी

विकासासाठी आठ हजार कोटींचा निधी

Next

लोकमत महाचर्चेत नितीन गडकरी यांची घोषणा : उपराजधानीत उड्डाणपुलांचे जाळे, अनेक रोडचे सिमेंटीकरण
नागपूर: नागपूरसह विदर्भातील लाखो लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दिशेने केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी एक एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दीड वर्षात सुमारे २४ हजार कोटींचे विविध प्रकल्प नागपूर शहर व जिल्ह्यासाठी मंजूर केल्यानंतर आता पुन्हा नागपूरच्या विकासासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली असल्याची घोषणा गडकरी यांनी लोकमत समूहातर्फे रविवारी आयोजित महाचर्चेत केली.
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे रविवारी कामठी मार्गावरील ईडन ग्रीन्झ येथे ‘लोकमत महाचर्चा एनएमसी-एनआयटी व्हीजन २०२० (नागपूरचा विकास : समस्या, अपेक्षा व नियोजन)’ ही एकदिवसीय परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलताना गडकरी यांनी विदर्भवासीयांना ही गुड न्यूज दिली. विदर्भाच्या विकासात गडकरी यांचे मोलाचे योगदान आहे. सत्तेत असो वा विरोधी बाकावर त्यांनी विकासाचा प्रवाह नेहमीच गतिशील केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे नागपूर आंतरराष्ट्रीय शहर होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यांनी मंजूर करून घेतलेल्या आठ हजार कोटी रुपयांच्या कामांतून वाहतूक व्यवस्था वेगवान करण्यासाठी शहरभर उड्डाणपुलांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. तसेच, अनेक महत्त्वाच्या मार्गांचे काँक्रिटद्वारे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. गडकरींनी केलेल्या या घोषणेमुळे महाचर्चेच्या आयोजनातून लोकहित साधण्याचा लोकमतचा हेतू साध्य झाला आहे.
 

Web Title: 8 thousand crores fund for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.