माता बम्लेश्वरीच्या डोंगरगडमध्ये थांबणार ८ रेल्वेगाड्या; भाविकांना मिळणार सुविधा

By नरेश डोंगरे | Published: March 17, 2023 10:09 PM2023-03-17T22:09:44+5:302023-03-17T22:10:56+5:30

चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वात छत्तीसगडमधील पवित्र तीर्थस्थान माता बम्लेश्वरी मंदिर डोंगरगड येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते.

8 trains will stop in Dongargad of Mata Bamleshwari; Devotees will get facilities | माता बम्लेश्वरीच्या डोंगरगडमध्ये थांबणार ८ रेल्वेगाड्या; भाविकांना मिळणार सुविधा

माता बम्लेश्वरीच्या डोंगरगडमध्ये थांबणार ८ रेल्वेगाड्या; भाविकांना मिळणार सुविधा

googlenewsNext

नागपूर : माता बम्लेश्वरीच्या दर्शनासाठी चैत्र नवरात्रीत भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने डोंगरगड रेल्वेस्थानकावर २२ ते ३० मार्चपर्यंत ८ रेल्वेगाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वात छत्तीसगडमधील पवित्र तीर्थस्थान माता बम्लेश्वरी मंदिर डोंगरगड येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते. यावेळी गडावर जत्राही भरते. मातेच्या दर्शनासाठी देशातील विविध भागांतून भाविक येथे येतात. त्यांना सोयीचे व्हावे म्हणून २२ ते ३० मार्चपर्यंत अस्थायी स्वरूपात ८ रेल्वेगाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. थांबे देण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत.

१२८१२ हटिया कुर्ला एक्स्प्रेस रात्री ८.२५ ला डोंगरगड रेल्वेस्थानकावर येईल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर पुढील प्रवासाला निघेल, १२८११ कुर्ला हटिया एक्स्प्रेस दुपारी ४.३३ ला येईल आणि ४.३५ ला पुढे निघेल. २०८१३ पुरी जोधपूर एक्स्प्रेसचे सकाळी ७.२७ वाजता आगमन होईल आणि ७.२९ वाजता प्रस्थान करेल. २०८१४ जोधपूर पुरी एक्स्प्रेस सायंकाळी ५.३८ वाजता स्थानकात पोहोचेल आणि ५.४० वाजता प्रस्थान करेल.

१२१४६ पुरी कुर्ला एक्स्प्रेस दुपारी २.२८ वाजता येईल आणि २.२३० वाजता पुढच्या प्रवासाला निघेल. १२१४५ कुर्ला पुरी एक्स्प्रेसचे दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी डोंगरगडला आगमन होईल आणि येथून १.१५ वाजता ती प्रस्थान करेल. १२८५१ बिलासपूर चेन्नई एक्स्प्रेस दुपारी १२.२१ वाजता येईल आणि १२.२३ वाजता तेथून निघेल. १२८५२ चेन्नई बिलासपूर एक्स्प्रेचे सकाळी १०.५३ ला आगमन होईल आणि १०.५५ ला ती प्रस्थान करेल.

गोंदिया दुर्ग गोंदिया धावणार रायपूरपर्यंत

मातेच्या दर्शनासाठी छत्तीसगडमधील भाविकांना सुविधा व्हावी म्हणून ०८७४२ गोंदिया दुर्ग आणि ०८७४१ दुर्ग गोंदिया ही रेल्वेगाडी उपरोक्त कालावधीत रायपूरपर्यंत धावणार आहे.

Web Title: 8 trains will stop in Dongargad of Mata Bamleshwari; Devotees will get facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर