दोन वर्षांत एसटीचे ८० अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:07 AM2021-02-07T04:07:29+5:302021-02-07T04:07:29+5:30

सर्वसामान्यांची एसटी किती सुरक्षित? नागपूर : सुरक्षित प्रवास म्हणून नागरिक एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. अपघात टाळण्यासाठी एसटी महामंडळ विविध ...

80 ST accidents in two years | दोन वर्षांत एसटीचे ८० अपघात

दोन वर्षांत एसटीचे ८० अपघात

Next

सर्वसामान्यांची एसटी किती सुरक्षित?

नागपूर : सुरक्षित प्रवास म्हणून नागरिक एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. अपघात टाळण्यासाठी एसटी महामंडळ विविध उपक्रम राबविते. परंतु असे असतानाही मागील दोन वर्षांत एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात किरकोळ, गंभीर आणि प्राणांतिक असे एकूण ८० अपघात झाल्याची नोंद करण्यात आल्यामुळे एसटीचा प्रवास किती सुरक्षित, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

एसटी महामंडळाच्या बसेसवरील चालक प्रशिक्षित असतात. त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन अपघात टाळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. परंतु तरीसुद्धा मागील दोन वर्षांत नागपूर विभागात एकूण ८० अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यात २०१९ मध्ये १९ किरकोळ, ३२ गंभीर आणि ६ प्राणांतिक अपघातांचा समावेश आहे. तर २०२० मध्ये १४ किरकोळ, ८ गंभीर आणि १ प्राणांतिक अपघात झाले आहेत. एसटी महामंडळात अपघात टाळण्यासाठी सुरक्षितता सप्ताह पाळण्यात येतो. बसेसचा स्पीड लॉक करण्यात येतो. एखादा चालक महिनाभर रजेवर असल्यास तो ड्युटीवर आल्यानंतर त्यास प्रशिक्षण देऊनच त्याच्या हाती स्टेअरिंग सोपविण्यात येते. तरीसुद्धा नागपूर विभागात दोन वर्षांत ८० अपघात झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे एसटीतील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एसटी प्रशासनाने ठोस उपाययोजना करून अपघातांवर नियंत्रण मिळविण्याची मागणी होत आहे.

..................

नागपूर विभागातील बसेस : ४६४

विभागातील चालक : ९१३

२०१९ मधील अपघात

किरकोळगंभीरप्राणांतिक

जानेवारी ५ २ ०

फेब्रुवारी २ २ ०

मार्च ३ १ ०

एप्रिल ० २ १

मे ३ ० ३

जून ० ३ ०

जुलै ० २ ०

ऑगस्ट ० ७ १

सप्टेंबर १ २ १

ऑक्टोबर १ ४ ०

नोव्हेंबर ० ४ ०

डिसेंबर ४ ३ ०

२०२० मधील अपघात

किरकोळगंभीरप्राणांतिक

जानेवारी २ १ ०

फेब्रुवारी १ १ ०

मार्च ० २ ०

एप्रिल ० ० ०

मे ० ० ०

जून १ ० ०

जुलै ० ० ०

ऑगस्ट १ १ ०

सप्टेंबर १ १ ०

ऑक्टोबर २ ० १

नोव्हेंबर ३ १ ०

डिसेंबर ३ १ ०

स्पिड लॉक करूनही अपघात

एसटी महामंडळाच्या बसेसचा अपघात होऊ नये यासाठी बसेसचा स्पीड लॉक करण्यात येतो. लालपरीचा स्पीड ७० किलोमीटर, पांढऱ्या रंगाच्या स्टील बॉडीच्या बसचा स्पीड ७६ किलोमीटर प्रतितास असतो. त्यामुळे चालक ठरवून दिलेल्या स्पीडपेक्षा अधिक वेगाने बस चालवू शकत नाही. तरीसुद्धा एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात दोन वर्षांत ८० अपघातांची नोंद करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वेळोवेळी होते प्रशिक्षण

‘एसटीच्या चालकांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येते. त्यांच्या हातून अपघात होऊ नयेत यासाठी उजळणी वर्ग घेण्यात येतात. सुरक्षितता सप्ताह पाळून अपघात न करता सेवा देणाऱ्या चालकांचा गौरव करण्यात येतो. एखादा चालक महिनाभर रजेवर असल्यास तो कामावर आल्यानंतर त्यास प्रशिक्षण देऊनच कामावर रुजू करून घेण्यात येते.’

- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

...........

Web Title: 80 ST accidents in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.