नागपुरात मनपा शाळांचा ८४.४१ टक्के निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:44 AM2018-05-31T01:44:51+5:302018-05-31T01:45:01+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी घोषित करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर महापालिकेच्या शाळांचा तिन्ही विभागाच्या निकालाची सरासरी टक्केवारी ८४.४१ इतकी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी घोषित करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात नागपूर महापालिकेच्या शाळांचा तिन्ही विभागाच्या निकालाची सरासरी टक्केवारी ८४.४१ इतकी आहे. विज्ञान शाखेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेचा विद्यार्थी धम्मदीप धर्मपाल गौरकर याने ७६.४६ टक्के, कला शाखेतून साने गुरुजी उर्दू उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी शिरीन परवीन हमीद खान हिने ८१.५४ टक्के तर वाणिज्य शाखेतून एम. ए. के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी सालेहा अंजुम आणि रफानाझ यांनी प्रत्येकी ७८.१५ टक्के गुण मिळवून संयुक्त प्रथम येण्याचा मान पटकावला.
विज्ञान शाखेतून प्रथम तिन्ही विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेतील आहेत. या शाखेत मृणाल सुधाकर पानतावणे याने ७४ टक्के गुणासह दुसरा तर नकुल ज्ञानेश्वर ठाकरे याने ७३.६९ टक्के गुणासह तिसरा क्र मांक पटकाविला. कला शाखेतून साने गुरुजी उर्दू उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी सुमेला परवीन मो. जफर खान हिने ७७.८५ टक्के गुण मिळवून दुसरा तर एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेच्या शायदा बेगम हिने ७१.२३ गुणासह तिसरा क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेतून एम.ए.के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेची शबीना परवीन हिने ७५ टक्के गुणासह दुसरा क्रमांक पटकाविला.
महापौर कक्षात आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्याचे कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, बसपाचे पक्षनेते मोहम्मद जमाल, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका प्रमिला मंथरानी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांना दीपराज पार्डीकर, तानजी वनवे व दिलीप दिवे आदींनी शुभेच्छा दिल्या.