चाेरट्यांकडून ८.४५ लाखाचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:08 AM2021-07-21T04:08:10+5:302021-07-21T04:08:10+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : पाेलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक केलेल्या दाेन चाेरट्यांना सावनेर येथील प्रथम श्रेणी ...

8.45 lakh looted from four | चाेरट्यांकडून ८.४५ लाखाचा ऐवज जप्त

चाेरट्यांकडून ८.४५ लाखाचा ऐवज जप्त

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा : पाेलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक केलेल्या दाेन चाेरट्यांना सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने गुरुवार (दि. २२)पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. या काळात त्यांच्याकडून घरफाेडीचे पाच व वाहनचाेरीचे दाेन गुन्हे उघड झाले असून, त्यांच्याकडून ८ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती ठाणेदार पुंडलिक भटकर यांनी दिली.

गाेपाल दुजेराम देवांगण (३१, रा. जरव्हाय, जिल्हा दुर्ग, छत्तीसगड) व राेहित ऊर्फ राजा हिवराज गेडाम (२१, रा. जमनापूर, ता. साकाेली, जिल्हा भंडारा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपी चाेरट्यांची नावे आहेत. खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस या चाेरट्यांच्या मागावर असतानाच स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या नेतृत्वातील पथकाने चार दिवसांपूर्वी अटक केली. गाेपाल हा मूळचा छत्तीसगडमधील रहिवासी असला तरी ता. काही वर्षांपासून खापरखेडा येथे तर राेहित भीम चाैक, इंदाेरा येथे राहायचा.

या दाेघांविरुद्ध खापरखेडा पाेलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १५) भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविण्यात आला हाेता. त्याअनुषंगाने खापरखेडा पाेलिसांनी दाेघांनाही ताब्यात घेत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली. या काळात खापरखेडा पाेलिसांनी दाेघांकडून त्यांच्या हद्दीतील घरफाेडीचे पाच व माेटरसायकल चाेरीचे दाेन गुन्हे उघड केले.

एवढेच नव्हे तर, त्यांच्याकडून ११ ताेळे साेन्याचे दागिने, ८५० ग्राम चांदी, एमएच-४०/एमएन-१४२५ क्रमांकाची दुचाकी, सीजी-०७/बीई-३१२६ क्रमांकाची माेटरसायकल, तीन एलसीडी टीव्ही, एक पाेलीस युनिफाॅर्म, घरगुती गॅस सिलिंडर व १० माेबाइल हॅण्डसेट असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती पाेलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत काळे यांनी दिली.

Web Title: 8.45 lakh looted from four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.