मालकी पट्ट्यांसाठी ८५ किलोमीटर पायी यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 10:27 PM2018-03-23T22:27:34+5:302018-03-23T22:43:19+5:30
झुडपी जंगल, गावठान जमिनीवर २५-३० वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी घरपट्टे, मालकीपट्टे मिळविण्यासाठी हजारो अतिक्रमणधारकांनी वर्धा ते नागपूर पायी मोर्चा काढला.त्यांची भू-देव यात्रा शुक्रवारी उपराजधानीत धडकली. तब्बल ८५ किलोमीटर पायपीट करीत आलेल्या लोकांची अवस्था पाहून नुकताच शेतकऱ्यांनी काढलेल्या नाशिक ते मुंबई पायी मोर्चाच्या आठवणी ताज्या केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झुडपी जंगल, गावठान जमिनीवर २५-३० वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी घरपट्टे, मालकीपट्टे मिळविण्यासाठी हजारो अतिक्रमणधारकांनी वर्धा ते नागपूर पायी मोर्चा काढला.त्यांची भू-देव यात्रा शुक्रवारी उपराजधानीत धडकली. तब्बल ८५ किलोमीटर पायपीट करीत आलेल्या लोकांची अवस्था पाहून नुकताच शेतकऱ्यांनी काढलेल्या नाशिक ते मुंबई पायी मोर्चाच्या आठवणी ताज्या केल्या. मुख्यमंत्र्यांनी स्वत: मोर्चाला सामोरे जावे व सकारात्मक निर्णय घ्यावा, त्याशिवाय परत जाणार नाही, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.
‘युवा : परिवर्तन की आवाज’ या तरुणांच्या संघटनेच्या माध्यमातून निहाल पांडे या तरुणाच्या नेतृत्वात ही भू-देव यात्रा काढण्यात आली. २० मार्च रोजी वर्ध्याच्या शिवाजी चौकातून पायी यात्रेला सुरुवात करण्यात आली. वर्धा व आसपासच्या १५ गावातील अतिक्रमणधारक मोर्चात सहभागी झाले. यामध्ये संघटनेच्या तरुणांसोबत महिला व आबालवृद्ध मोठ्या संख्येत सहभागी झाले. पायी मोर्चेकरांनी २१ ला सेलू व २२ रोजी आसोला येथे मुक्काम केला. मोर्चेकरी गुरुवारी रात्री नागपूरला दाखल झाले. शुक्रवारी सकाळीच मोर्चेकऱ्यांनी छत्रपती चौकातून संविधान चौकाकडे कूच केली. जय जवान जय किसान संघटनेनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून संघटनेचे प्रशांत पवार या मोर्चात सहभागी झाले. पंचशील चौकात उड्डाणपुलाखाली बसून यात्रेकरूंनी रस्ता रोखून धरला. त्याचवेळी माजी खासदार आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भेट देऊन आंदोलकांना संबोधित केले.
निहाल पांडे याने सांगितले, अतिक्रमणधारक आज वसले नाहीत. हे गरीब लोक गेल्या ३५-४० वर्षांपासून खेड्यातील वनजमिनी किंवा गावठान जमिनीवर राहत आहेत. काहींनी पक्की घरे बांधली तर काही झोपड्यात जगत आहेत. मतांवर डोळा ठेवणारे राजकारणी निवडणुकीच्या वेळी आश्वासन देतात. मात्र कुणीही यांना न्याय दिला नाही. या गावठान जागी राहू देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पैशांची मागणी केली जाते व त्रास दिला जातो. राहत असले तरी मालकी पट्टे नसल्याने यांना कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही आणि मुलांचे शिक्षण व व्यवसायासाठी बँकेकडून कर्जही मिळत नाही. अतिक्रमणधारकांना मालकी पट्टे देण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आले. मात्र हे सर्व जीआर फसवे असून शासन व प्रशासन या निर्णयांची अंमलबजावणी करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला.हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नाही. त्यांच्यावर आमची आशा आहे. त्यांनी निराशा करू नये, अशी भावना निहाल पांडे यांनी व्यक्त केली. मोर्चात पलाश उमाटे, शरद भगत, भास्कर सोनटक्के, कोमल झाडे, समीर गिरी, राहुल दारुणकर, आकाश बोरीकर, सूर्या हिरेखण, अमित भोसले, प्रशांत गणोरे, सोनू दाते, अक्षय बाळसराफ, शेखर इंगोले, पंकज गणोरे, विजू आग्रे, गौरव वानखेडे, शैलेश पंचेश्वर, रोहन सोंडेकर, शुभम सोनुले, कुणाल शंभरकर, अभिषेक बाळबुधे, सौरभ माकोडे आदींनी मोर्चाचे संयोजन केले.
पायाची चाळण झाली
भर उन्हात चार दिवसांमध्ये पायी ८५ किमीचे अंतर पार करणा:या या आंदोलकांपैकी काहीचे पाय सोलून निघाले. काही महिलांच्या पायांची अक्षरश: चाळण झाली. चार दिवसाच्या प्रवासाने चेहरे काळवंडले होते. कितीही त्रस झाला तरी चालेल, पण, हक्क मिळविल्याशिवाय परत जाणार नाही, असा निर्धार पाय सोलल्यानंतरही महिलांनी व्यक्त केला.
पटोलेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला. म्हणाले की, नाशिक ते मुंबई दरम्यान शेतक:यांनी काढलेल्या मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी आश्वासनांची खैरात वाटत आजचे मरण उद्यावर ढकलले. अंमलबजावणी मात्र केली नाही. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता मिळविणा:या भाजपच्या राज्यात रयतच दु:खी आहे. फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे लोकशाहीचे फायदे लाटण्यात मशगूूल आहेत. गरिबांना हक्काच्या घरासाठी पैसे मागणो लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. वध्र्यासह राज्यातील अतिक्रमणधारकांच्या प्रलंबित प्रकरणारावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
प्रशांत पवार यांनीही केला हल्ला
प्रशांत पवार यांनी मोर्चेक:यांना पाठिंबा देत सरकारवर असंवेदनशील असल्याची टीका केली. कष्टकरी महिला, लहान मुले, म्हातारे ८५ किलोमीटर चालत आले आहेत. अनेकांचे पाय सोलले आहेत. तरीही सरकारकडून व प्रशासनाकडून संवेदनशीलता दाखविली जात नाही. नाशिक-मुंबई मोच्र्याप्रमाणो आम्हीही ८०० किमी पायी चालत यावे का, असा सवाल त्यांनी केला. मालकी हक्काचे पट्टे घेतल्याशिवाय सोडणार नाही. मुख्यमंत्री भेटले नाही तर आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा त्यांनी दिला.