जिल्ह्यात २० वर्षांत ८५० आत्महत्या, ५२३ प्रकरणात मदतच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:07 AM2021-03-19T04:07:44+5:302021-03-19T04:07:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला १९ मार्चला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. ...

850 suicides in 20 years in the district, 523 cases without help | जिल्ह्यात २० वर्षांत ८५० आत्महत्या, ५२३ प्रकरणात मदतच नाही

जिल्ह्यात २० वर्षांत ८५० आत्महत्या, ५२३ प्रकरणात मदतच नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या पहिल्या शेतकरी आत्महत्येला १९ मार्चला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. एवढ्या वर्षांनंतरही आत्महत्येची धग थांबलेली नाही. नागपूर जिल्ह्यात मागील २० वर्षांत म्हणजे २००१ पासून तर आतापर्यंत ८५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील फक्त ३०८ प्रकरणेच मदतपात्र ठरली असून, ५२३ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.

नागपूर जिल्ह्यात मागील वर्षात २०२० मध्ये शेतकरी आत्महत्येची ५१ प्रकरणे घडली. त्यातील २९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात येऊन, फक्त ८ प्रकरणे मदतपात्र ठरविण्यात आली. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपयाची मदत देण्यात आली आहे. यातील १४ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. याच २०२१ या वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात जिल्ह्यात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तीन घटना जानेवारी महिन्यात तर दोन घटना फेब्रुवारी महिन्यात घडल्या. ही पाचही प्रकरणे जिल्हा प्रशासनाने चौकशीसाठी प्रलंबित ठेवली आहेत.

...

जिल्ह्यात २०१९ मध्ये झालेल्या आत्महत्या : ५७

मदतीसाठी पात्र : २८

जिल्ह्यात २०२० मध्ये झालेल्या आत्महत्या : ५१

मदतीसाठी पात्र : ८

...

त्र्यंबक पांडुरंग तागडे (अंबोला, त. नरखेड) यांनी ३ जून २०२० ला आत्महत्या केली होती. शेतीच्या बळावर दोन मुलींचे लग्न केले. दोन मुलांपैकी अमोल हा मानसिक रुग्ण व दिव्यांग आहे. लहान सागर याने गरिबीमुळे शिक्षण सोडून मजुरीचे काम धरले. पत्नी नंदा ब्रेस्ट कॅन्सरची रुग्ण आहे. कर्ता पुरुष गेला, आता जगण्याचा संघर्ष सुरू आहे.

...

रामटेक तालुक्यातील महादुला येथे २०२० मध्ये अश्विन माराेतराव काठाेके (४२) यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्यावर बँक आफ इंडिया बँकेचे ७० हजार, महिला बचत गटाचे ३० हजार तसेच व्याजाने व हातउसने घेतलेले असे दाेन लाख रुपयांचे कर्ज हाेते. शासनाकडे सर्व कागदपत्रे सादर करूनही मदत मिळाली नाही. घरी तीन एकर शेती आहे. माेलमजुरी करून पत्नी रेखा या दोन मुलांना कसेबसे जगवीत आहेत.

...

काटोल येथील मनोहर दाजीबा रेवतकर (४५) यांनी १५ ऑगस्ट २०१९ ला आत्महत्या केली. त्यांच्यावर १ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज होते. आत्महत्येला दीड वर्ष लोटूनही मदत मिळालेली नाही. एक मुलगी आणि मुलगा असा दोघांचा शिक्षणाचा खर्च सांभाळण्यासाठी त्यांची पत्नी कविता यांना आता खासगी कामाला जावे लागत आहे.

...

तालुक्यातील चिखली येथील शेतकरी राजेंद्र डोमाजी पिंपळकर या तरुण शेतकऱ्याने ११ जानेवारी २०१९ रोजी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. जान्हवी व साक्षी या मुलींचे पालकत्व हरपले. राजेंद्रकडे केवळ चार एकर शेती होती. विधवा झालेली पत्नी कविता मुलींच्या शिक्षणासाठी शेतात कष्ट उपसते. दोन्ही मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याचे मोठे आव्हान कविता पुढे आहे.

...

वृत्त संकलन : राहुल पेठकर (रामटेक), शिरीष खोबे (नरखेड), अमोल काळे (काटोल), शरद मिरे (भिवापूर)

Web Title: 850 suicides in 20 years in the district, 523 cases without help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.