जिल्ह्यात ८५ हजारावर जोखमीचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:07 AM2021-06-02T04:07:25+5:302021-06-02T04:07:25+5:30

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह नागपूर जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही जागृती मोहीम राबविण्यात ...

85,000 at-risk patients in the district | जिल्ह्यात ८५ हजारावर जोखमीचे रुग्ण

जिल्ह्यात ८५ हजारावर जोखमीचे रुग्ण

Next

नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह नागपूर जिल्ह्यात दोन टप्प्यांमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही जागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कुटुंबीयांच्या आरोग्य तपासणीबरोबरच दुर्धर आजाराचीही माहिती घेण्यात आली. जिल्ह्यात एकूण संकलित झालेल्या आढाव्यात ८५,४६४ रुग्ण इतर आजाराचे आढळले.

या सर्वेक्षणासाठी नागपूर जिल्ह्यात आशावर्कर व अंगणवाडी सेविका यांचे पथक तयार करण्यात आले होते. प्रशासनाने नेमून दिलेल्या पथकाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन ताप, सर्दी, खोकला, सारी तसेच संसर्गाशिवाय इतर आजार असलेल्या लोकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत शहर, गाव, पाडे, वस्त्या, तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, जोखमीचे आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तिश: भेटून आरोग्यशिक्षण देण्यात आले होते. एक पथक सुमारे ५० घरांना भेट देऊन रुग्णांचे ह्रदयरोग, दमा, क्षयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांची माहिती घेतली. अशा आजारामुळे कोरोनाकाळात हे रुग्ण अतिधोकादायक स्तरावर असल्याने याची विशेष काळजी घेण्याचा या मोहिमेचा उद्देश होता.

- सर्वेक्षणाचा आढावा

एकूण कुटुंब संख्या - ५,११,४८४

सर्वेक्षण झालेले कुटुंब - ४,९४,१९७

एकूण लोकसंख्या - २३,१७,०३४

सर्वेक्षण झालेल्या लोकांची संख्या - २१,८८,९४७

सर्वेक्षणासाठी पथके - १,९९४

- सर्वेक्षणात आढळले विविध आजाराचे रुग्ण

आजार व्यक्तीसंख्या

मधुमेह ३२,८००

हायपरटेन्शन ४,२३६

मूत्रपिंडाचे आजार ४८८

यकृत आजार ४५८

इतर आजाराने ग्रस्त ४७,४८२

सारी ७५०

कोविड २०२

- सर्वेक्षणात तालुकानिहाय आढळलेले रुग्ण

तालुका एकूण रुग्ण

नागपूर ५,२४६

कामठी ६,१३२

हिंगणा २७,३९२

काटोल ५,६२०

नरखेड ४,७५५

सावनेर ६,३८९

कळमेश्वर ४,९३६

रामटेक ४,२८२

पारशिवनी ३,२१०

मौदा ३,६९६

उमरेड ८,८२१

भिवापूर २,३६५

कुही ३,५२०

- कोरोनाचा धोका हा विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना जास्त असल्याने, या मोहिमेच्या माध्यमातून आशावर्कर घरोघरी पोहोचल्या. घरात गंभीर आजार असलेल्या रुग्णांची माहिती पुढे आली. त्यामुळे आम्हालाही या रुग्णांवर फोकस करता आले. घरच्यांनाही आम्ही या लोकांची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले होते. या मोहिमेमुळे उपाययोजना करण्यास मदत झाली.

डॉ. अविनाश सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.

Web Title: 85,000 at-risk patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.