८६ कोटींच्या घोटाळ्यातील महिला आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 01:08 AM2021-01-19T01:08:47+5:302021-01-19T01:10:11+5:30
fraud, woman accused arrested, crime news ८६ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी जय श्रीराम अर्बन क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसायटीची व्यवस्थापिका सुनीता पोल हिला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ८६ कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी जय श्रीराम अर्बन क्रेडिट को - ऑपरेटिव्ह सोसायटीची व्यवस्थापिका सुनीता पोल हिला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. तिला न्यायालयात हजर करून पोलिसांनी तिची सात दिवसांची कोठडी मिळवली.
या प्रकरणात पोलिसांनी सोसायटीचे अध्यक्षक खेमचंद मेहरकुरे, त्याचा मुलगा अभिषेक मेहरकुरे, योगेश चरडे, अशोक दुर्गुडे, कुश कावरे आणि अर्चना टेके या सहा आरोपींना अटक केली होती. हे सर्व आता न्यायालयीन कोठडीत (कारागृहात) आहेत. व्यवस्थापक सुनीता पोल फरार होती. तिने अटकपूर्व जामीन मिळवण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्यात तिला यश मिळाले नाही, त्यामुळे ती पोलिसांच्या हाती लागली.