फ्लॅटच्या बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची ८७.७५ लाखाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 07:49 PM2022-10-01T19:49:41+5:302022-10-01T19:50:03+5:30
Nagpur News बनावट कागदपत्र तयार करून बँक ऑफ महाराष्ट्र मधून ८७ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेणारे चार आरोपी आणि बँकेच्या थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन टीमचे अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : फ्लॅट घ्यायचा असल्याचे सांगून बनावट कागदपत्र तयार करून बँक ऑफ महाराष्ट्र मधून ८७ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज घेणारे चार आरोपी आणि बँकेच्या थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन टीमचे अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शेख इद्रीस शेख युनूस (३६),फिरोजा इद्रीस शेख (३२) दोघे रा. यशोदीप कॉलनी, महेंद्रनगर, हुकुमचंद उर्फ आदेश परसराम भलावी (४०, अलंकारनगर बेसा रोड), गुलाम प्यारे साहब अशरफी (३७, संपदा अपार्टमेंट, जयभीम चौक, यादवनगर) आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन टीमचे अधिकारी व कर्मचारी अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी २५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२२ दरम्यान संगनमत करून आपल्या आर्थिक फायद्यासाठी निर्माण सेल्टर्समधील फ्लॅट क्रमांक ३०१,३०३ खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून बँक ऑफ महाराष्ट्र कडून ८७ लाख ७५ हजार रुपये कर्ज घेतले. याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे मिरची बाजार शाखेचे व्यवस्थापक साकेत उमाशंकर प्रसाद (३३, अरिहंत अपार्टमेंट, कोतवाली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ४२०, ४०९, ४७१, १२० (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.