जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ८९.५६ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:04+5:302020-12-31T04:11:04+5:30
नागपूर : जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये यंदा भरपूर पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे यंदा पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे ...
नागपूर : जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये यंदा भरपूर पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे यंदा पाण्याचे नियोजन करताना पाटबंधारे विभागावर ताण येणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण ७७ सिंचन प्रकल्प असून, यात ५ मोठे प्रकल्प व १२ मध्यम प्रकल्प तसेच ६० लघु प्रकल्पांचा समावेश आहे. यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत मुबलक पाऊस झाला. त्यामुळे सर्वच प्रकल्पांमध्ये पाणीसाठा आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन करताना फारशी अडचण जाणार नसल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अशी आहे उपलब्धता
नागपूर जिल्ह्यातील एकूण ७७ प्रकल्पांची मिळून १७७७.७३ दलघमी क्षमता आहे. यापैकी मोठ्या पाच प्रकल्पांमध्ये १२७७.३० दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. १२ मध्यम प्रकल्पामध्ये १६०.०५ दलघमी, तर ६० लघु प्रकल्पामध्ये १२७.०५ दलघमी असा एकूण १५६४.४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ही टक्केवारी एकूण धारणक्षमतेच्या ८९.५६ टक्के आहे.
अशी आहे मागणी
नागपूर जिल्ह्यात घरगुती व औद्योगिक दोन्ही मिळून नोव्हेंबर-२०२० ते जून-२०२१ या आठ महिन्याच्या काळासाठी एकूण २३०.२९५ दलघमी पाण्याची मागणी आहे. या काळात जिल्ह्यातील मोठ्या पाच प्रकल्पातून १५१.४२ दलघमी, १२ मध्यम प्रकल्पातून १९.४२ दलघमी व ६० लघु प्रकल्पातून ३.२९ दलघमी पाण्याच्या मागणीची नोंद आहे. यासोबतच नदीवरून असणाऱ्या पाणीपुरवठ्याची मागणी ५६.१७५ दलघमी आहे. घरगुती व औद्योगिक पाणी मागणीच्या तुलनेत साठा मुबलक आहे.