९८ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

By admin | Published: February 21, 2016 02:28 AM2016-02-21T02:28:04+5:302016-02-21T02:28:04+5:30

वानाडोंगरी येथील राजीवनगरात असलेल्या शांतिनिकेतन विद्यालयातील ९८ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली.

9 8 Poisoning from students in Khichdi | ९८ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

९८ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

Next

मेडिकलमध्ये उपचार रुग्णांची प्रकृती स्थिर ३०० विद्यार्थ्यांनी घेतले होते मध्यान्ह भोजन
नागपूर/हिंगणा : वानाडोंगरी येथील राजीवनगरात असलेल्या शांतिनिकेतन विद्यालयातील ९८ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाली. यातील ९१ विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्व विद्यार्थी इयत्ता पहिली ते सातवीमध्ये शिकणारे आहेत. विशेष म्हणजे, ३०० विद्यार्थ्यांनी ही खिचडी खाल्ली होती. यामुळे रात्री रुग्णांची संख्या वाढल्यास मेयो रुग्णालय सज्ज ठेवण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

शांतिनिकेतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवारी दुपारी २.१३ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे शालेय पोषण आहारात खिचडी देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास यातील काही विद्यार्थ्यांना उलट्या व्हायला सुरुवात झाली. काहींच्या पोटातही दुखायला लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही बाब मुख्याध्यापक व शिक्षकांना सांगितली. शिक्षकांनी खिचडीची तपासणी केली असता खिचडीत पाल असल्याचे आढळून आले. पाहता पाहता विद्यार्थ्यांची संख्या रात्री १० वाजेपर्यंत ९१ वर पोहोचली. सुरुवातीला शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांना हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुलांना तपासून मेडिकल रुग्णालयात पाठविले. मेडिकलच्या वॉर्ड क्र. ६ मध्ये ३१ मुले तर अपघात विभागाच्या वॉर्डात ६० मुलांना भरती करण्यात आले. सध्या सर्वच मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. समीर मेघे यांनी मेडिकलमध्ये भरती असलेल्या मुलांना भेट देऊन प्रकृतीची चौकशी केली.

अधिष्ठात्यांनी सांभाळली रुग्णसेवा

नागपूर : वॉर्ड क्र. ६ पासून ते अपघात विभागामध्ये बालरोग विभागाचा एकही वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नव्हता. रुग्णांची गर्दी आणि त्यांच्या नातेवाईकांचा रोष वाढता पाहून अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी मेडिकल गाठले. त्यांनी लागलीच रुग्णसेवा सांभाळत रुग्णांची व्यवस्था केली. घरी झोपलेल्या डॉक्टरांना रुग्णालयात येण्याचे फर्मान सोडले. परिचारिकांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत ेसर्वांनीच पुढे येऊन औषधांची सोय केली. रात्री उशिरापर्यंत डॉ. निसवाडे, डॉ. सी.एम. बोकडे व इतर डॉक्टरांची चमू मेडिकलमध्ये उपस्थित होती. (प्रतिनिधी)

वरिष्ठ डॉक्टर बेपत्ता
मेडिकलमध्ये रात्रीच्या वेळी वरिष्ठ डॉक्टर बेपत्ता राहत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले. अपघात विभागात बालरोग विभागाचा एकही वरिष्ठ डॉक्टर नव्हता. बालरोग विभागाच्या वॉर्ड क्र. ६ मधील वरिष्ठ डॉक्टर सुटीवर असल्याने त्यांच्या जागेवर कोणीच नव्हते. धक्कादायक म्हणजे, सीएमओ आणि केवळ एक महिला निवासी डॉक्टर रात्री ९.३० वाजेपर्यंत या सर्व रुग्णांना उपचार देत होते. रुग्णालयाची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकाची असते. मात्र एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण आले असताना त्यांनी मेडिकलमध्ये येण्याचे सौजन्यही दाखविले नाही. एवढेच नव्हे तर जनसंपर्क अधिकारी यांनीही आपलाा फोन बंद करून ठेवला होता.

मुले, पालक दहशतीत
आपल्या मुलांना काही होणार तर नाही ना, या दहशतीत पालक होते. तर पोट दुखत असल्याचे कारण सांगितल्याने त्यांना रुग्णालयात भरती केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे वेगळेच भाव दिसत होते. वॉर्डात रुग्णाच्या नातेवाईकांनी गर्दी केल्याने डॉक्टरांना काम करण्यात अडचणी येत होत्या .

एका खाटेवर चार मुलांवर उपचार
अचानक रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली. यातच सुरुवातीला एकही वरिष्ठ डॉक्टर नसल्याने उपचार करण्यास उशिरा सुरुवात झाली. अपघात विभागाचा वॉर्ड आणि वॉर्ड क्र. ६ मध्ये एकेका खाटेवर चार-चार मुलांना झोपवून उपचार सुरू केले, तर काहींना जमिनीवर गादी टाकून त्यांची सोय केली. सलाईन लावण्यासाठी परिचारिकांची संख्याही कमी पडली. रुग्णांचे नातेवाईक संपलेली सलाईन बंद करण्यासाठी आरडाओरड करीत होते.
पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
घटनेची माहिती मिळताच रात्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे मेडिकलमध्ये पोहचले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. विद्यार्थ्यांना आवश्यक ते उपचार देण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या. सोबतच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही दिले.
मेडिकलमध्ये तीन तासानंतर उपचार
मेडिकलच्या अपघात विभागात सुमारे ७ वाजतापासून रुग्ण यायला सुरुवात झाली. अचानक एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण आल्याने मेडिकल प्रशासनाची तारांबळ उडाली. अनेक रुग्णांवर तीन-चार तास लोटूनही उपचार झाले नव्हते. लहान मुले हातात केसपेपर घेऊन डॉक्टरांसमोर बसले होते तर काही उभे होते. निवासी डॉक्टर आपल्यापरीने प्रयत्न करीत होते. रात्री ९ वाजेपर्यंत मेडिकलमध्ये एकही वरिष्ठ डॉक्टर आलेले नव्हते.
 
Web Title: 9 8 Poisoning from students in Khichdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.