९ प्रतिष्ठानांना ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:07 AM2021-03-28T04:07:30+5:302021-03-28T04:07:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी शनिवारी ५० प्रतिष्ठानांची तपासणी केली. ९ जणांकडून ...

9 establishments fined Rs 50,000 | ९ प्रतिष्ठानांना ५० हजारांचा दंड

९ प्रतिष्ठानांना ५० हजारांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेच्या एनडीएसच्या पथकांनी शनिवारी ५० प्रतिष्ठानांची तपासणी केली. ९ जणांकडून ५० हजारांचा दंड वसूल केला.

लक्ष्मीनगर झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार, तर धरमपेठ झोनअंतर्गत सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. हनुमाननगर झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांची तपासणी केली. धंतोलीमध्ये १० प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार दंड वसूल केला. नेहरूनगरमध्ये तीन प्रतिष्ठानांची तपासणी केली,. गांधीबाग झोनच्या पथकाने दोन प्रतिष्ठानांकडून २० हजार तर सतरंजीपुरा पथकाने तीन प्रतिष्ठानांची तपासणी केली. १० हजार दंड वसूल केला. लकडगंजच्या पथकाने ११ प्रतिष्ठानांची तपासणी केली. आशीनगर झोनच्या पथकाने सात प्रतिष्ठांनाची तपासणी करून ५ हजार दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या पथकाने ४ प्रतिष्ठानांची तपासणी केली. एनडीएस पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

Web Title: 9 establishments fined Rs 50,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.