बिट कॉइनच्या नावाखाली नागपुरात ९ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 05:39 AM2018-08-07T05:39:54+5:302018-08-07T05:39:57+5:30

कमी अवधीत जास्त रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘गेन बिट कॉइन’ कंपनीच्या नावाखाली लोकांना गंडा घालण्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे.

9 lakhs in Nagpur under the name of Bit Coin | बिट कॉइनच्या नावाखाली नागपुरात ९ लाखांना गंडा

बिट कॉइनच्या नावाखाली नागपुरात ९ लाखांना गंडा

Next

नागपूर : कमी अवधीत जास्त रक्कम मिळवून देण्याचे आमिष दाखवून ‘गेन बिट कॉइन’ कंपनीच्या नावाखाली लोकांना गंडा घालण्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे.
गणेशपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, जरीपटक्यातील शैलेंद्र वानखेडे (४०) यांना अमित भारद्वाज, इंद्रजीत बोरा आणि हेमंत सूर्यवंशी या तिघांनी ८ लाख, ७९ हजारांचा गंडा घातला.
वानखेडे यांच्या तक्रारीनुसार, भारद्वाज, बोरा आणि सूर्यवंशी या तिघांनी गेन बिट कॉइन नामक कंपनीची फेसबुकवर जाहिरात केली. या कंपनीत बिट कॉइनच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास अल्पावधीत रक्कम दुप्पट, तिप्पट होते, अशी थाप मारली. वानखेडे यांनी २० नोव्हेंबर २०१६ पासून रक्कम गुंतवली. प्रारंभी रक्कम आॅनलाइन वाढत असल्याचा बनाव आरोपींनी केला. नंतर मात्र ते संकेतस्थळ बंद करून प्रतिसाद देणे बंद केले.

Web Title: 9 lakhs in Nagpur under the name of Bit Coin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.