वेणा, कान्होलीबारासह ९ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:08 AM2021-09-21T04:08:49+5:302021-09-21T04:08:49+5:30
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बहुतेक धरणे आता भरली असून ९ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नदीनाल्यांना पुराची शक्यता वर्तविली ...
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बहुतेक धरणे आता भरली असून ९ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नदीनाल्यांना पुराची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे प्रशासनाने आणि हवामान विभागाने जनतेला सावधगिरीचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील चार मोठ्या धरणांपैकी उमरेड तालुक्यातील वडगाव धरण ९४ टक्के भरले आहे. तोतलाडोह ८६ टक्के तर
नवेगाव खैरी ७९ टक्के आणि नांद ७६ टक्के भरले आहे. या सोबतच १२ मध्यम प्रकल्पांपैकी ९ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. सांडव्यावरून पाणी वाहत असल्याने बहुतेक सर्व नद्या काठोकाठ भरून वाहत आहेत. काही नद्या धोक्याच्या पातळीच्या जवळपास पोहोचल्या आहेत. हवामान विभागाने येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचाही इशारा दिला असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
...
नद्या धोक्याच्या पातळीजवळ
जिल्हा : नदी : ठिकाण : धोक्याची पातळी : सध्याची पातळी
(पातळी मीटरमध्ये)
गोंदिया : बाघ : रजेगाव काठी : २८० : २७७.६०
भंडारा : वैनगंगा : कारधापूल : २४५ : २४४.२
भंडारा : वैनगंगा : पवनी : २२६.७४ : २२१: ९१
नागपूर : कन्हान : माथनी : २६३.७२ : २५१: ७७
गोंदिया : वैनगंगा : देवरी : २७७.३० : २६७.४४
गोंदिया : बावनथडी : महालगाव : २६३.५० : २५८.२०
वर्धा : वेणा : हिंगणघाट : २१२.२४ : २०३.२७
चंद्रपूर : वैनगंगा : वाघुली बुटी : २१२.३१ : २०६.२०
गडचिरोली : वैनगंगा : वडसा : २१५.२० : २०७.७२
....
जिल्ह्यात मध्यम प्रकल्पांची स्थिती
वेणा : १०० टक्के
कान्होलीबारा : १०० टक्के
पांढराबोडी : १०० टक्के
मकरधोकडा : ४६ टक्के
सायकी : ९६ टक्के
चंद्रभागा : १०० टक्के
मोरधाम : १०० टक्के
केसरनाला १०० टक्के
उमरी : १०० टक्के
कोलार : १०० टक्के
खेकरानाला : ९६ टक्के
जाम : १०० टक्के
...
गेट केव्हाही उघडणार
हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने धरणात पाणीसाठा अधिक जमा झाल्यास मोठ्या धरणाचे गेट केव्हाही उघडले जाऊ शकतात, अशी स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अवजारे तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावी, अशी आगाऊ सूचनाही प्रशासनाने दिली आहे. धोक्याच्या परिस्थितीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा नियंत्रण कक्षाच्या ०७१२-२५६२६६८ किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
...